Student Dainik Gomantak
देश

Agniveer भरती परीक्षा आजपासून सुरु, 'योजना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक'

Indian Air Force: भारतीय हवाई दलात प्रथमच अग्निपथ योजनेद्वारे भरतीसाठी परीक्षा रविवारपासून सुरु झाली.

दैनिक गोमन्तक

Indian Air Force: भारतीय हवाई दलात प्रथमच अग्निपथ योजनेद्वारे भरतीसाठी परीक्षा रविवारपासून सुरु झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात आज देशभरात परीक्षा पार पडत आहे. ही परीक्षा दिल्ली, कानपूर आणि पाटणासह देशातील अनेक भागांमध्ये घेण्यात आली आहे. 24 जुलै ते 31 जुलै दरम्यान ही परीक्षा होणार आहे.

दरम्यान, वायुसेनेत अग्निवीरच्या भरतीसाठी यूपीच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये परीक्षा घेण्यात येत आहे. कानपूरमध्ये अग्निवीर वायुसेनेच्या परीक्षेसाठी पोलिसांनी (Police) कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्तासह हवाई दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात येत आहे.

दुसरीकडे, अग्निवीर परीक्षेसाठी एकूण 11 केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यापैकी सहा केंद्रे कानपूर आऊटरमध्ये आहेत. परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेतली जात आहे. आज कानपूरमध्ये एकूण 31,875 उमेदवार या परीक्षेला बसले आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये 625 विद्यार्थी बसतील.

बिहारमधील 26 केंद्रांवर अग्निवीरांची पहिली परीक्षा

आजपासून राजधानी पाटणामधील 13 केंद्रांसह बिहारमधील (Bihar) 26 केंद्रांवर परीक्षा सुरु झाली आहे. पाटणा येथील 13 केंद्रांसह राज्यातील 26 केंद्रांवर रविवारी अग्निवीर वायूची ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. राज्यात एकूण 26 विविध केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश केंद्रे राजधानी पाटणा येथे सुरु करण्यात आली आहेत. पाटणातील बेऊर, खगौल, दानापूर, पाटलीपुत्र, कंकरबाग आदी भागात ऑनलाइन परीक्षा केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, ही परीक्षा प्रथमच घेतली जात आहे. यामध्ये अग्निपथ योजनेंतर्गत देशातून हवाई दलाच्या 3500 पदांची भरती केली जाणार आहे. या परीक्षेतील सर्व प्रश्न बारावीचे आहेत. पहिला पेपर विज्ञान (Physics, Chemistry and Mathematics) चा आहे ज्यासाठी 60 मिनिटांचा वेळ असेल. दुसरा पेपर इंग्रजीचा आहे, ज्यासाठी 45 मिनिटांचा वेळ असेल. त्याचप्रमाणे तिसर्‍या सेटमध्ये रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस चाचणी 85 मिनिटांची असेल.

अग्निवीर योजना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक : राहुल

त्याचवेळी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी पुन्हा अग्निपथ योजनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) हल्लाबोल केला. त्यांचा हा प्रयोग राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि तरुणांच्या भवितव्यासाठी घातक असल्याचे ते म्हणाले. राहुल म्हणाले की, ''अग्निपथ योजना तरुणांच्या भवितव्याशी कसा खेळ करत, याचा अंदाज यावरुन बांधता येतो. सध्या दरवर्षी 60 हजार सैनिक निवृत्त होतात, मात्र तीन हजार माजी सैनिकांना सरकारी नोकऱ्या मिळतात.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT