India Population Prediction Dainik Gomantak
देश

India Population: भारताच्या लोकसंख्येबाबत नवीन अपडेट! 40 वर्षांनी गाठणार मोठा आकडा; प्रजनन दरात मात्र होतेय घट

India Population Prediction: सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांत भारताचे पहिले स्थान कायम असून सध्या जवळपास दीड अब्ज असलेली देशाची लोकसंख्या आणखी ४० वर्षांनंतर १.७ अब्जांवर पोचेल.

Sameer Panditrao

नवी दिल्ली: लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनलेल्या भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये १.४६ अब्ज होण्याची शक्यता आहे. मात्र, देशाचा एकूण प्रजनन दर हा पुनरुत्पादन दरापेक्षा कमी झाल्याचेही संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्याशास्त्रीय अहवालावरून उघड झाले आहे.

संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी (यूएनएफपीए) २०२५ च्या ‘द रिअल फर्टिलिटी क्रायसिस’ या अहवालात घटत्या प्रजनन क्षमतेबद्दलच्या भीतीपासून अपूर्ण प्रजनन उद्दिष्टांकडे वळण्याचे आवाहनही केले आहे. लाखो लोक आपली प्रजननविषयक उद्दिष्टे ओळखू शकत नाहीत, याकडेही अहवालात लक्ष वेधले आहे.

आपल्यापुढील खरे संकट हेच आहे, कमी किंवा जास्त लोकसंख्या ही खरी आपत्ती नाही. याचे उत्तर पुनरुत्पादन संस्थेत आहे. लैंगिक संबंध, गर्भनिरोधके आणि कुटुंब सुरू करण्याबद्दल स्वतंत्र आणि माहितीपूर्ण निवड करण्याच्या व्यक्तीच्या क्षमतेत आहे, असेही नमूद केले आहे.

सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांत भारताचे पहिले स्थान कायम असून सध्या जवळपास दीड अब्ज असलेली देशाची लोकसंख्या आणखी ४० वर्षांनंतर १.७ अब्जांवर पोचेल. त्यानंतर ती घटण्यास सुरूवात होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे. यामागे लाखो जोडप्यांचा कुटुंबविस्ताराचा निर्णय तसेच गर्भवती होण्याबाबत कमी पर्याय असणाऱ्या महिला आहेत.

१९६० मध्ये देशाची लोकसंख्या ४३.६ कोटी असताना प्रत्येक महिला सरासरी सहा मुलांना जन्म देत होती. आज हा आकडा दोन मुलांवर आला आहे. चारपैकी एक महिलाच संततीनियमनाच्या साधनांचा वापर करते. मात्र, आगामी काही दशकांत शिक्षण, पुनरुत्पादनविषयक आरोग्यात सुधारणा आदींमुळे अनेक महिला आपल्या जीवनाचे प्रमुख निर्णय घेतील, असेही अहवालात म्हटले आहे.

या अहवालात लोकसंख्येची रचना, प्रजनन क्षमता आणि आयुर्मानातील महत्त्वाच्या बदलांवरही प्रकाशझोत टाकला आहे. हे बदल मोठ्या लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचे संकेत देतात. प्रजनन दर हा आवश्यक पुनरुत्पादन दरापेक्षा कमी झाला आहे. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत लोकसंख्येचा आकार टिकविण्यासाठी भारतीय महिला तुलनेने कमी मुलांना जन्म देत आहेत, असा याचा अर्थ होतो.

प्रजनन दर कमी होऊनही देशाच्या लोकसंख्येत युवकांचे प्रमाण लक्षणीय आहे. काम करणाऱ्या १५ ते ६४ या वयोगटातील लोकसंख्या ६८ टक्के असून धोरणात्मक पाठिंबा आणि पुरेसा रोजगार मिळाल्यास लोकसंख्याशास्त्रीय फायदे मिळू शकतात, असेही अहवालात म्हटले आहे. आयुर्मान वाढत असल्याने ज्येष्ठांची संख्या सध्याच्या सात टक्क्यांपेक्षा अधिक वाढू शकते.

जागतिक प्रजनन दरही घटतोय

भारताप्रमाणेच जगाच्या प्रजनन दरातही घट होत असल्याचा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालात काढला आहे. यूएनएफपीएने १४ देशांतील १४ हजारांहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण केले. यात भारतासह दक्षिण कोरिया, थायलंड, इटली, हंगेरी, जर्मनी, स्वीडन, ब्राझील आदी देशांचा समावेश आहे. या

देशांमध्ये कमी, मध्यम व उच्च उत्पन्नांच्या देशांचा समावेश होता. अनेक जोडप्यांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुले हवी असली तरी आर्थिक व इतर कारणांमुळे ती होऊ शकत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

Raksha Bandhan Wishes in Marathi: राखीच्या धाग्यात गुंफलेलं मायेचं नातं... रक्षाबंधननिमित्त भावा-बहिणीच्या नात्यातील जिव्हाळा वाढवणारे 'या' खास शुभेच्छा संदेश

India-America Relations: 'भारतासोबतचे संबंध खराब करु नका...'! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ नितीवरुन अमेरिकन खासदाराने फटकारले

Raksha Bandhan: 'या' देवांना राखी बांधा, संकटाना दूर पळवा! जाणून घ्या रक्षाबंधनाचे महत्व

SCROLL FOR NEXT