Asia Cup 2025 India vs Pakistan Cancelled
आशिया कप सुरू झाला आहे. भारत आणि युएई यांच्यातील पहिला सामनाही खेळवण्यात आला आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र कोर्टानं या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिलाय. सामना खेळण्यास बंदी नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलंय.
जनहित याचिकेतील याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला होता, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर असा सामना आयोजित करणे राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध आहे. भारत-पाकिस्तान सामना आयोजित करणे सुरक्षा दलांच्या आणि शहीद नागरिकांच्या बलिदानाचा अपमान ठरेल.
आशिया कप अंतर्गत १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. भारताने आशिया कपचा पहिला सामना खेळला आहे. २०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने यूएईला ५७ धावांत गुंडाळले.
कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांनी यामध्ये ७ विकेट्स घेतल्या. भारताने यूएईविरुद्ध ९ विकेट्सने विजय मिळवला. अशाप्रकारे, आशिया कपमध्ये भारताच्या विजयाची सुरुवात विजयाने झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.