Asia Cup 2025 Final Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025 Final: मिशन फायनल! भारताच्या Playing 11 मध्ये मोठे फेरबदल, 'या' दोन खेळाडूंच्या जागी नवे चेहरे

India vs Pakistan: आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये दोन मोठे बदल होऊ शकतात.

Sameer Amunekar

आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा मानल्या जाणाऱ्या आशिया कप २०२५ चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा हाय-व्होल्टेज सामना पाहण्यासाठी संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

भारत या सामन्यात आपले नववे विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असेल, तर पाकिस्तान तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचा निर्धार करून मैदानात उतरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजेच क्रिकेटप्रेमींसाठी भावनांचा स्फोट असतो, आणि यावेळी तर ट्रॉफीचा प्रश्न असल्यामुळे या अंतिम लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अंतिम सामन्यासाठी दोन महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याचे संकेत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती देऊन त्यांच्या जागी जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांना संधी देण्यात आली होती.

कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यापूर्वी सांगितले होते की, दोन्ही खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात बुमराह आणि दुबे यांची जागा निश्चित दिसत आहे. संघात याशिवाय मोठे बदल अपेक्षित नाहीत.

दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा आपल्या संघावर पूर्ण विश्वास दाखवत आहे. सुपर फोर फेरीत सलग दोन विजय मिळवून दिलेल्या अकरा खेळाडूंनाच अंतिम सामन्यात उतरवण्याचा त्यांचा मानस आहे.

हा निर्णय पाकिस्तानसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या स्पर्धेत भारताविरुद्ध मागील दोन पराभवांचा बदला घेण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत:
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

पाकिस्तान:
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आघा (कर्णधार), हुसेन तलत, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद

या अंतिम सामन्यामुळे क्रिकेटविश्वात प्रचंड उत्सुकता आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली असून “कौण होईल आशियाचा बादशहा?” हा प्रश्न चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. भारत-पाकिस्तानचा अंतिम सामना असो किंवा रणधुमाळीची अपेक्षा, दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी हा रविवार अविस्मरणीय ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT