Pakistan Attack India 
देश

पाकिस्तानची दोन F-17 भारताने पाडली; पाकचा जम्मू, जैसलमेर आणि पठाणकोट येथे हल्ल्याचा प्रयत्न

Pakistan Attack India: पाकिस्तानने केलेला ड्रोन हल्ला भारताने परतवून लावला असून, एअर डिफेन्स सिस्टिमने हे ड्रोन नष्ट केले आहेत.

Pramod Yadav

नवी दिल्ली: भारताच्या ऑपरेशन संदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतातील विविध ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन पाठविल्यानंतर पाकिस्तानने पाठणकोट, जैसलमेर, अकनूर या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे. भारताने पाकिस्तानची एफ -१७ ही दोन फायटर जेट खाली पाडली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्याने देखील याची कबुली दिली आहे.

पाकिस्तानने चिनी बनावटीच्या एफ -१७ द्वारे भारतात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारताने पाकिस्तानचे फायटर जेट खाली पाडण्यात आले.

पाकिस्तानने सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन पाठवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने सुरक्षा प्रणालीच्या मदतीने (एस-४००) पाकिस्तानचे आठ मिसाईल खाली पाडण्यात आले. पाकिस्तानने सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अरिना सेक्टरमध्ये या मिसाईने हल्ला करण्यात आला होता.

पाकिस्तानी ड्रोन जम्मू आणि काश्मीरमध्ये दिसल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सायरन वाजवून पूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आला. भारतात घुसखोरी करणाऱ्या ड्रोनला भारताच्या सुरक्षा प्रणालीने खाली पाडले. याशिवाय पाकिस्तानने राजस्थानमधील जैसलमेर, पंजाबमधील पठाणकोट एअरबेस तसेच, जम्मू विद्यापीठ परिसरात देखील हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम तत्काळ कार्यरत झाले आणि पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT