India Airstrike Video Dainik Gomantak
देश

Operation Sindoor Video: पाकिस्तानमध्ये घुसून मारलं! 23 मिनिटांत 9 दहशतवादी तळ कसे उद्धवस्त केले? पाहा व्हिडिओ, फोटो

India Pakistan War: रात्री १.२८ वाजता सुरु झालेले ऑपरेशन सिंदूर २३ मिनिटांनी १.५१ वाजता यशस्वी करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

Operation Sindoor Video

नवी दिल्ली: भारतीय सैन्याच्या वतीने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर रात्री दीड वाजता हवाई हल्ला करुन तळ उद्धवस्त केले. भारताने पाकिस्तानात कार्यरत असणारे जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा आणि हिजबुल्ल मुज्जाहिद्दीनचे तळ ऑपरेशन सिंदूरद्वारे उद्धवस्त करण्यात आले. यात शेकडो दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही सैन्य दलाने संयुक्त पद्धतीने ही कारवाई केली. अवघ्या २३ मिनिटांत भारतीय सैन्यांनी हे ऑपरेशन यशस्वी केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. भारताने याचा बदला घ्यावा अशी देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती. भारत सरकारने देखील याल प्रत्युत्तर देण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत निर्णय घेण्याची पूर्ण मुभा देण्यात आली होती.

दरम्यान, पहलगाम येथील हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. रात्री १.२८ वाजता सुरु झालेले ऑपरेशन सिंदूर २३ मिनिटांनी १.५१ वाजता यशस्वी करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.

भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि मुजफ्फराबादमधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आले. बहावलपूर, मुरीदके, सवाई, गुलपूर, बिलाल, कोटली, बरनाला, सरजाल, महमूना या ठिकाणांवर भारताने हल्ला केला.

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे आता व्हिडिओ समोर आले आहेत. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारताने या हल्ल्यासाठी अत्याधुनिक राफेल आणि सुकोई फायटर जेटचा वापर केला. राफेलच्या स्काल्फ क्षेपणास्त्र वापरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान भारताच्या हल्ल्यानंतर बिथरला असून, प्रतिक्रिया दाखल तोही उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पण, पाकिस्तानच्या कोणत्याही प्रतिक्रियेसाठी तिन्ही भारतीय सैन्य दल सज्ज आहेत. पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असून, सामान्य नागरिकांना टार्गेट केले जात असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT