Death Dainik Gomantak
देश

कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यावर भारताने घेतला आक्षेप

कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याच्या WHO च्या दाव्यावर भारताने आक्षेप घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतात कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. म्हणजेच भारताने दिलेल्या आकडेवारीपेक्षा 47 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील सर्व देशांनी दिलेल्या आकडेवारीपेक्षा 2020-21 या वर्षात कोरोनामुळे 1 कोटी 49 लाख अधिक मृत्यू झाल्याचा दावाही डब्ल्यूएचओने (WHO) गुरुवारी केला आहे. 84% मृत्यू फक्त आग्नेय आशिया, युरोप आणि अमेरिकेत (America) झाले आहेत.

दरम्यान, WHO ने जारी केलेल्या डेटावर आमचा आक्षेप असल्याचे भारताने म्हटले आहे. डब्ल्यूएचओचे मॉडेल, डेटा संकलन, डेटा स्त्रोत, प्रक्रिया (Methods) यावरही प्रश्न आहेत. आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही सर्व अधिकृत माध्यमांचा वापर करु. त्याचबरोबर आम्ही या डेटावरील आक्षेप कार्यकारी मंडळाकडे नोंदवू, असे देखील भारताकडून (India) सांगण्यात आले आहे.

तसेच, 17 राज्यांच्या आधारे डेटा जारी करण्यात आला, मग 17 राज्यांची निवड कोणत्या आधारावर करण्यात आली? चार महिन्यांनी चौकशी करुन आम्हाला या राज्यांची नावे सांगण्यात आली. डब्ल्यूएचओने डेटा किती वेळ आणि किती काळासाठी घेतला याची माहिती दिली नाही. नोव्हेंबरपासून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या संदर्भात WHO ला 10 पत्रे लिहिली, परंतु WHO ने कोणालाच उत्तर दिले नाही. डब्ल्यूएचओचे डीजी, टेड्रोस यांच्या भारत भेटीवर, अशा डेटाबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला होता, ते म्हणाले, "आमची तांत्रिक टीम याकडे लक्ष देत आहे."

याशिवाय, मृत्यूचे हे आकडे राज्यांच्या संकेतस्थळांवरुन घेतले आहेत, आरटीआय आणि टेलिफोनिक सर्वेक्षणाचा हवाला देऊन वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या.. तुमच्याकडे अधिकृत आकडेवारी का नाही? असा सवाल देखील भारताकडून उपस्थित करण्यात आला आहे.

या राज्यांच्या आधारे मृत्यूचे आकडे: महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, हिमाचल, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आसाम, आंध्र प्रदेश, चंदीगड बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. WHO चे म्हणणे आहे की, भारतातील 60% लोकसंख्या या राज्यांमध्ये आहे. आम्ही 2020 चा डेटा दिला. 2021 चा डेटा येणार असेल, तर तो आम्ही देऊ. आमचा डेटा जन्म आणि मृत्यू नोंदणी कायद्यांतर्गत भारताच्या रजिस्ट्रार जनरलकडून येतो, असे WHO कडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT