जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोवॅक्सिनच्या आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर बंदी घातली आहे, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (जीएमपी) म्हणजेच चांगल्या उत्पादन पद्धतीच्या अभावामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे. कोवॅक्सीन ही भारतातील पहिली स्वदेशी कोरोना लस आहे, ही लस बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने एक दिवस आधी घोषणा केली होती की, ते लसीचे उत्पादन कमी करणार आहेत, त्यानंतर WHO चा हा निर्णय समोर आला आहे. (WHO closes stock of international vaccines)
WHO ने 2 एप्रिल रोजी या घोषणेबाबत एक निवेदन प्रसारित केलं आहे. त्यानुसार, WHOने म्हटले आहे की, लस घेणारे देश या लसीविरुद्ध कारवाई करू शकतात. कोवॅक्सीन निलंबित करण्याची घोषणा EUL तपासणीनंतर करण्यात आला आहे. डब्ल्यूएचओच्या टीमने 14 मार्च ते 22 मार्च 2022 पर्यंत भारत बायोटेकच्या प्लांटची तपासणी देखील केली होती.
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी WHO ने कोवॅक्सीनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती, लसीमध्ये जीएमपीची कमतरता काय आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाहीये. WHO ने सांगितले की, 'भारत बायोटेक GMP च्या उणिवा दूर करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) आणि WHO यांना सादर करण्यासाठी एक सुधारात्मक आणि प्रतिबंधात्मक कृती योजना तयार करण्यात येत आहेत. अंतरिम आणि सावधगिरीचा उपाय म्हणून, भारताने निर्यातीसाठी कोवॅक्सिनचे उत्पादन स्थगित करण्याची आपली वचनबद्धता ठळकपणे दर्शविली आहे.
WHO ने लसीच्या सुरक्षिततेवर आणि FKC वर कोणतेही प्रश्न उपस्थित केलेले नाहीत ही एक दिलासादायक बाब आहे. भारत बायोटेकने एक निवेदन जारी करून म्हटले की, गेल्या एक वर्षात कंपनीने सार्वजनिक आरोग्याचा विचार करून सातत्याने काम करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत आता अपग्रेड होण्याची जास्त गरज आहे. कंपनी आता प्रलंबित सुविधा देखभाल, प्रक्रिया आणि सुविधा ऑप्टिमायझेशन गोष्टींवर लक्ष केंद्रित करेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.