Taliban Dainik Gomantak
देश

भारताची तालिबानबरोबर चर्चा; कतारमध्ये घेतली भेट

परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांच्या विनंतीवरुन ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने नियंत्रण मिळविल्यानंतर भारताने प्रथमच या संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. दोहा येथे भारताच्या राजदूतांनी तालिबान नेत्यांची भेट घेतली असून अफगाणिस्तानच्या हद्दीतून दहशतवाद्यांना दिल्या जात असलेल्या शरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतीय राजदूतांनी कतारची राजधानी दोहा येथे तालिबान नेत्याशी चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांच्या विनंतीवरुन ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल (Ambassador Deepak Mittal) यांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनकझई (Sher Mohammad Abbas Stenkzai) यांची भेट घेतली. निवेदनानुसार ही बैठक दोहा येथील भारतीय दूतावासात झाली. या दरम्यान, अफगाणिस्तान प्रदेशातून दहशतवाद्यांच्या शरणाबद्दल यावेळी भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली. स्टेनेकझाई यांनी आश्वासन दिले की, भारताकडून व्यक्त केलेल्या चिंतेचा विचार करण्यात येईल.

निवेदनात असेही म्हटले आहे की, 'अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि जलद परतण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. अफगाणिस्तानच्या नागरिकांचा, विशेषत: अल्पसंख्यांकांचा, ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांचा मुद्दाही चर्चेदरम्यान उपस्थित झाला. माहितीनुसार, राजदूत दीपक मित्तल म्हणाले की, अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही प्रकारे भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादासाठी वापरली जाऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT