Air Quality Index  Dainik Gomantak
देश

Pollution Index India: भारतावर प्रदूषणाची दाट काजळी; बिहारमधील बेगुसराय हे प्रथमच जगातील सर्वाधिक प्रदूषित महानगर

Pollution Index India: जगातील प्रदूषित देश आणि शहरांची ही यादी २०२३ मधील असून त्यात प्रदूषित देशांमध्ये बांगलादेश पहिल्या क्रमांकावर असून पाकिस्तान दुसऱ्या स्थानी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pollution Index India: भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ‘आयक्यूएअर’ या स्वित्झर्लंडमधील हवा गुणवत्ता निरीक्षण संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

जगातील प्रदूषित देश आणि शहरांची ही यादी २०२३ मधील असून त्यात प्रदूषित देशांमध्ये बांगलादेश पहिल्या क्रमांकावर असून पाकिस्तान दुसऱ्या स्थानी आहे.

या अहवालानुसार बिहारमधील बेगुसराय हे प्रथमच जगातील सर्वाधिक प्रदूषित महानगर ठरले आहे. हवेची सर्वात खराब गुणवत्ता असलेले राजधानीचे शहर म्हणून दिल्लीचे नाव यंदाही आले आहे.

सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचे नाव २०१८ पासून चार वेळा आले आहे. ‘जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३’ या अहवालात १३४ देशांची यादी आहे. सात हजार ८१२ ठिकाणांवरील ३० हजारहून अधिक हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षण केंद्रांवरून तपशील गोळा करण्यात आला आहे.

भारतात गेल्या वर्षी पीएम (पर्टिक्युलेट मायक्रॉन - कण) २.५’चा स्तर वार्षिक सरासरी दर एक घन मीटरमागे ५४.४ मायकोग्रॅम होता.

यादीत प्रथम स्थानी बांगलादेश (७९.९ मायकोग्रॅम प्रती घन मीटर) आणि दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान (७३.७ मायकोग्रॅम प्रती घन मीटर) आहे.

भारत २०२२ मध्ये जगातील आठवा सर्वाधिक प्रदूषित देश होता. त्यावेळी देशाचा ‘पीएम २.५’ स्तर सरासरी ५३.३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होता.

जगातील सर्वात प्रदूषित ५० शहरांच्या यादीत भारतातील ४२ शहरे होती. २०२३ मध्ये बेगुसराय हे सर्वात प्रदूषित महानगर होते. त्यानंतर गुवाहाटी आणि दिल्लीचा क्रमांक आहे.

हवेची सर्वात खराब गुणवत्ता असलेले राजधानीचे शहर म्हणून दिल्लीचे नाव यादीत प्रथम आहे. जागतिक यादीतील पहिल्या ५० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये ग्रेटर नोएडा (क्र.११), मुझफ्फरनगर (१६), गुरुग्राम (१७), आरा (१८), दादरी (१९), पाटणा (२०), फरिदाबाद (२५), नोएडा (२६), मेरठ (२८), गाझियाबाद (३५) आणि रोहतक (४७) या शहरांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT