Team India Dainik Gomantak
देश

IND vs ENG: भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे आणि टी20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर, आठ सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!

India vs England Series Schedule: आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Manish Jadhav

India vs England Series Schedule: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यातील तीन सामने झाले असून चौथा सामना मँचेस्टरमध्ये सुरु आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (World Test Championship) भाग आहे. या दरम्यान, आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचेही वेळापत्रक (Schedule) जाहीर करण्यात आले आहे. ही मालिका पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये खेळली जाईल.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) 2026 च्या उन्हाळ्यात होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये इंग्लंड संघ न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेव्यतिरिक्त भारतीय संघासोबतही भिडताना दिसेल. भारत (India) आणि इंग्लंड यांच्यात पाच टी20 सामन्यांची मालिका, त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल.

टी20 आणि वनडे मालिकेचे वेळापत्रक:

भारतीय संघ 2026 च्या जुलै महिन्यात जवळपास पूर्ण महिनाभर इंग्लंडमध्येच (England) असेल.

पाच टी20 सामन्यांची मालिका (1 ते 11 जुलै)

  • 1 जुलै 2026: पहिला टी20 सामना

  • 4 जुलै 2026: दुसरा टी20 सामना

  • 7 जुलै 2026: तिसरा टी20 सामना

  • 9 जुलै 2026: चौथा टी20 सामना

  • 11 जुलै 2026: पाचवा टी20 सामना

तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका (14 ते 18 जुलै):

  • 14 जुलै 2026: पहिला वनडे सामना

  • 16 जुलै 2026: दुसरा वनडे सामना

  • 18 जुलै 2026: तिसरा वनडे सामना

ही मालिका एकूण आठ सामन्यांची असेल आणि ती जुलै 2026 मध्ये पूर्ण होईल.

सध्याची कसोटी मालिका आणि तिचे महत्त्व

सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून, पाच कसोटी सामने खेळून परत येईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असल्याने या कसोटी मालिकेचे महत्त्व अधिक आहे. सध्याच्या मालिकेत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने इंग्लंडने जिंकले आहेत, तर एक भारताने जिंकला आहे. आता उर्वरित दोन सामने मालिकेची दिशा ठरवतील. मात्र, पुढील वर्षी (2026) होणाऱ्या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी सामने खेळणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Goa Live News: साखळी येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT