Passengers undergo strict screening after Ebola alert Dainik Gomantak
देश

इबोला संसर्गाबाबत केंद्र सरकारकडून हेल्थ ॲडव्हायझरी जारी, देशातील सर्व आंतरराष्ट्रीय एंट्री पॉईंट्सवर कडक स्क्रिनिंगचे आदेश

Indian Airports Ebola Passenger Screening: केंद्र सरकारने इबोला व्हायरसच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी मोठी खबरदारी घेतली असून संपूर्ण देशामध्ये 'हेल्थ ॲडव्हायझरी' जारी केली.

Manish Jadhav

Indian Airports Ebola Passenger Screening: जगातील वाढत्या आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने इबोला व्हायरसच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी मोठी खबरदारी घेतली असून संपूर्ण देशामध्ये 'हेल्थ ॲडव्हायझरी' जारी केली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 'ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी' म्हणजेच जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. या घोषणेनंतर भारत सरकारने तातडीने पावले उचलत देशातील सर्व विमानतळे, बंदरे आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे कडक स्क्रिनिंग करण्याचे आदेश दिले. या आदेशाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले.

सध्या इबोला व्हायरसचा हाहाकार मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील कांगो, युगांडा, सुदान, गिनी, लायबेरिया आणि सिएरा लिओन या देशांमध्ये पाहायला मिळत आहे. या प्राणघातक व्हायरसच्या विळख्यात आल्यामुळे आतापर्यंत 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 500 लोक संक्रमित झाले. याच कारणामुळे भारत सरकारने या देशांतून येणाऱ्या किंवा तिथून प्रवास करुन भारतात पोहोचणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवण्यास सांगितले. प्रामुख्याने कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमधून येणारे प्रवासी या व्हायरसचे वाहक असण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांची इमिग्रेशन तपासणी होण्यापूर्वीच विमानतळावरील हेल्प डेस्क किंवा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत कसून तपासणी केली जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना आणि प्रवाशांना आवाहन केले की, जर कोणत्याही प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसून आली किंवा ते आफ्रिकेत कोणत्याही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले असतील, तर त्यांनी स्वतःहून आरोग्य अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी. इबोलाबाबत कोणताही निष्काळजीपणा दाखवल्यास हा आजार कोरोना महामारीसारखा वेगाने पसरुन अत्यंत घातक आणि जीवघेणा ठरु शकतो, असा इशाराही सरकारने दिला. दिलासादायक बाब म्हणजे भारतात अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, धोका टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य विभागाची एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले.

या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांकडे एक विशेष एसओपी सोपवली. या एसओपीमध्ये प्रवाशांचे स्क्रिनिंग, क्वारंटाईन प्रोटोकॉल, रुग्णांचे व्यवस्थापन, रेफरल सिस्टीम आणि लॅब टेस्टिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश आहे. हा व्हायरस 'ऑर्थोइबोलावायरस' कुटुंबातील एक झुनोटिक व्हायरस आहे. यामध्ये रुग्णाला अचानक तीव्र ताप येणे, अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी, घसा खवखवणे, तसेच स्नायू आणि सांधे दुखी यांसारखी लक्षणे दिसतात. या आजाराचे सर्वात मुख्य आणि भयंकर लक्षण म्हणजे रुग्णाच्या शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य अवयवांमधून कोणत्याही कारणाशिवाय रक्तस्त्राव सुरु होतो. त्यामुळे ही लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार घेणे बंधनकारक करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT