Agni-1 Ballistic Missile Dainik Gomantak
देश

Agni-1 Ballistic Missile: भारताने अग्नी-1 चे केले यशस्वी प्रक्षेपण, शत्रूला भरणार धडकी!

Agni-1 Ballistic Missile: भारताने गुरुवारी (1 जून) ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-1 ची यशस्वी चाचणी केली.

Manish Jadhav

Agni-1 Ballistic Missile: भारताने गुरुवारी (1 जून) ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-1 ची यशस्वी चाचणी केली.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते भारत भूषण यांनी माहिती दिली की, हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूकतेने लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे.

ते पुढे म्हणाले की, प्रक्षेपणात क्षेपणास्त्राच्या सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक बाबींची यशस्वीपणे पडताळणी करण्यात आली.

दरम्यान, भारत गेल्या दोन दशकांपासून विविध बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, अचूक-मार्गदर्शित युद्धसामग्री आणि संबंधित 'प्लॅटफॉर्म' विकसित करुन आपली सामरिक क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. भारताने (India) 'अग्नी' मालिकेतील क्षेपणास्त्रांचे विविध प्रकार विकसित केले आहेत.

गेल्या डिसेंबरमध्ये भारताने अग्नी-5 या आण्विक-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली, जी 5,000 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर अचूक मारा करु शकते.

अग्नी 1 ते 4 क्षेपणास्त्रांचा पल्ला 700 किमी ते 3,500 किमी आहे. विशेष म्हणजे, ते आधीच तैनात करण्यात आले आहे.

याआधी, भारताने 10 जानेवारी 2023 रोजी पृथ्वी-2 या कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे (Missile) यशस्वी परीक्षण केले होते. हे प्रक्षेपण ओडिशाच्या चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीतून करण्यात आले.

पृथ्वी-2 क्षेपणास्त्र ही एक अत्यंत कार्यक्षम यंत्रणा आहे. या प्रशिक्षण प्रक्षेपणाद्वारे क्षेपणास्त्राचे सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक मापदंड यशस्वीरित्या सत्यापित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT