Agni 5 Missile Test: भारताने अग्नी-5 क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी, चीन-पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा!

Agni-5 Test: भारताने आपल्या सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी केली आहे.
Agni-5 missile
Agni-5 missileDainik Gomantak
Published on
Updated on

Agni 5 Missile Test: भारताने आपल्या सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी भारतापासून 5000 किलोमीटर अंतरापर्यंत मर्यादित असलेल्या चीन आणि पाकिस्तानसह त्या सर्व देशांसाठी धोक्याची घंटा आहे. आण्विक क्षमतेने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5 हजार किलोमीटर आहे.

Agni-5 missile
ड्रॅगनच्या मिसाईल समोर भारताचं अग्नी 5 किती पॉवरफुल, जाणून घ्या

चाचणी दरम्यान, या क्षेपणास्त्राने 5500 किलोमीटरचे अंतर कापले आणि टारगेटला नष्ट केले. आशियातील सर्व देश, युक्रेन, रशिया, जपान, इंडोनेशिया (Indonesia) आणि युरोपचा काही भाग डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने तयार केलेल्या या क्षेपणास्त्राच्या जेडी अंतर्गत येतील. म्हणजेच अर्ध्या जगाला लक्ष्य करण्यास सक्षम आहे.

तसेच, ओडिशातील (Odisha) अब्दुल कलाम बेटावरुन अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. चाचणीमध्ये डमी वॉर हेड वापरण्यात आले. ही चाचणी नवीन तंत्र आणि उपकरणांच्या सहाय्याने करण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्वीपेक्षा हलके आहे. यासोबतच गरज पडल्यास अग्नी-5 क्षेपणास्त्राची रेंज वाढवण्याची क्षमता या चाचणीने सिद्ध केल्याचीही माहिती देण्यात आली आहे. भारताने केलेल्या या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर चीन नक्कीच अडचणीत आला असेल.

Agni-5 missile
भारताची गगनभरारी, अग्नी-4 क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी

डीआरडीओने क्षेपणास्त्र विकसित केले

अग्नी-5 हे स्वदेशी संरक्षण क्षेत्रातील दिग्गज संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने विकसित केले आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवरील अब्दुल कलाम बेटावरुन भारतीय लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने त्याची चाचणी घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीपूर्वी अधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आणि बंगालच्या उपसागराला नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com