India became a 1billionaire in COVID-19 Vaccination Dainik Gomantak
देश

भारताने लसीकरणात गाठला 100 कोटींचा आकडा, देशभरात 'लसोत्सव' !

भारत देशात COVID- 19 लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या पुढे गेला आहे.

दैनिक गोमन्तक

देशाने लसीकरणात (Vaccination) एक मोठा टप्पा गाठला आहे. भारत देशात COVID- 19 लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या पुढे गेला आहे. यानिमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करून देशाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले, "भारताचे अभिनंदन! दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचा हा परिणाम आहे.(India became a 1billionaire in COVID-19 Vaccination)

भारताने आज सकाळी 9.48 वाजता 100 कोटी डोसचा आकडा पार करून जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 100 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.भारतातील सुमारे 75 टक्के प्रौढांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे, तर 31 टक्के लोकसंख्येला दोन्ही मिळाले आहेत. त्याचबरोबर केंद्राने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 102 कोटींपेक्षा जास्त डोस दिले आहेत.

100 कोटी डोसचा ऐतिहासिक टप्प्पा साध्य केल्याबद्दल संपूर्ण देशभर उत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत देशभरात कार्यक्रम विविध आयोजित करून ज्यांनी लसीकरणासाठी योगदान दिले त्यांना कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. देशात 100 कोटी डोस देण्याच्या निमित्ताने आरोग्यमंत्री मनसुख मांडविया लाल किल्ल्यावरून गायक कैलाश खेर यांचे गाणे देखील प्रदर्शित करणार आहेत.यासोबतच देशातील सर्वात मोठा खादी तिरंगा लाल किल्ल्यावर या ऐतिहासिक क्षणावेळी फडकवला जाईल. एवढेच नाही तर हा आंनदी क्षण सर्वांच्या लक्षात राहावा म्हणून विमान, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर याची घोषणा करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT