Ruchi Pathak Dainik Gomantak
देश

'भारताला 99 वर्षांच्या लीजवर स्वातंत्र्य मिळालं'

यातच आता भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रवक्त्या रुची पाठक (Ruchi Pathak) यांनी एका पॅनल चर्चेदरम्यान भारताच्या स्वातंत्र्याविषयी धक्कादायक वक्तव्य करुन वाद निर्माण केला आहे.

दैनिक गोमन्तक

देशात भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) सरकार आल्यापासून विविध मानवी शोध हे आर्वाचीन, प्राचीन काळात लागले असल्याचे अनेक महान दावे नेत्यांकडून यापूर्वी करण्यात आले आहेत. गोमूत्राचे प्राशन केल्यानंतर कोरोना (Covid 19) होत नसल्याचे दावेही भारतासरख्या देशातच करण्यात आले. यातच आता भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रवक्त्या रुची पाठक (Ruchi Pathak) यांनी एका पॅनल चर्चेदरम्यान भारताच्या स्वातंत्र्याविषयी धक्कादायक वक्तव्य करुन वाद निर्माण केला आहे. झाशीतील (Jhansi) द लॅलनटॉपच्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या (Uttar Pradesh Elections) विशेष कार्यक्रमात पाठक यांनी यांनी आपल्या अकलेचे पूर्णत:हा दर्शन घडवून दिले. त्या यावेळी म्हणाल्या, भारत पूर्णपणे स्वतंत्र झालेला नाही, पूर्वीच्या ब्रिटीश साम्राज्याने भारताला “99 वर्षांच्या लीजवर” स्वातंत्र्य दिले आहे.

दरम्यान, इतर पॅनेलचे सदस्य आणि होस्ट सौरभ द्विवेदी (Saurabh Dwivedi) यांनी निदर्शनास आणल्यानंतर, हा दावा राजकारण्यांकडून करण्यात आलेला नसून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत कट रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. 1947 चा भारत स्वातंत्र्य कायदा, ब्रिटिश साम्राज्यापासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी अटी निश्चित करणारा कायदेशीर दस्तऐवज देखील "लीज" किंवा "99" वर्षांच्या मुदतीचा उल्लेख करत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT