Independence Day 2022| PM Modi Twitter
देश

PM मोदींचे देशाला संबोधन, म्हणाले...गांधी, बोस, सावरकर आणि आंबेडकर यांचे स्मरण करण्याची हीच योग्य वेळ

Independence Day 2022: देश आज स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत असुन यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून सलग 9व्यांदा ध्वजारोहण केले.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोमवारी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या शहीदांचे स्मरण केले आणि त्यांना नमन केले. यासोबतच त्यांनी वीर सावरकर आणि संविधान निर्माते भीमराव आंबेडकर यांचे स्मरण करून त्यांना स्मरण करण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग 9व्यांदा देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी जगभरात पसरलेल्या भारतप्रेमींना, भारतीयांना स्वातंत्र्याच्या (Independence Day 2022) या अमृतोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो. देशवासियांना स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहे.

आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर यांचे स्मरण करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढे म्हणाले की, भारत ही लोकशाहीची जननी आहे. पीएम मोदी म्हणाले की, आम्ही खूप त्रास सहन केला आहे. कधी दहशतवाद, कधी युद्ध तर कधी अन्न संकटाचा सामना करावा लागला आहे.

मोदींकडून महिला योद्धांना अभिवादन

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या महिला योद्धांना पंतप्रधानांनी अभिवादन केले. मोदींनी म्हटलं की, भारतातील महिला (Women) काय करू शकतात हे सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यासाठी अनेक वीर महिला योद्धांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण करून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून येतो. राणी लक्ष्मीबाई, दुर्गाभाभी, बेगर हजरत महल या पराक्रमी महिला योद्धांना अभिवादन.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT