Shubman Gill Catch Dainik Gomantak
देश

Shubman Gill Catch: फलंदाजीत शतक, फिल्डिंगमध्ये 'सुपरमॅन'; हवेत उडी घेत गिलने टिपला अविश्वसनीय झेल, VIDEO पाहून व्हाल थक्क

Shubman Gill Catch Video: फलंदाजीत शतक झळकावल्यानंतर गिलने एका शानदार झेलच्या मदतीने वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावात भारताला पहिले यश मिळवून दिले.

Manish Jadhav

Shubman Gill Catch Video: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याने क्षेत्ररक्षणामध्ये आपला 'सुपरमॅन' अवतार दाखवला. फलंदाजीत शतक झळकावल्यानंतर गिलने एका शानदार झेलच्या मदतीने वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावात भारताला पहिले यश मिळवून दिले.

भारताची 270 धावांची मोठी आघाडी

भारतीय संघाने (Team India) आपला पहिला डाव 518 धावांवर घोषित केला. यानंतर वेस्ट इंडीजचा संघ पहिल्या डावात केवळ 248 धावांपर्यंतच मजल मारु शकला. परिणामी, वेस्ट इंडीजला फॉलोऑन (Follow-on) मिळाला. दुसऱ्या डावातही वेस्ट इंडीजची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी केवळ 17 धावांच्या स्कोअरवर आपली पहिली विकेट तेगनारायण चंद्रपॉल (Tagenarine Chanderpaul) याच्या रुपात गमावली आणि हा झेल शुभमन गिलने खूपच अविश्वसनीय पद्धतीने टिपला.

हवेत लांब उडी घेत टिपला झेल

फॉलोऑन मिळाल्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा तेगनारायण चंद्रपॉल आणि जॉन कॅम्पबेल यांनी सावधगिरीने खेळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 17 धावांपर्यंत डाव सांभाळला, पण त्याचवेळी मोहम्मद सिराजने टाकलेला एक शॉर्ट बॉल चंद्रपॉलने खाली ठेवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत उंच उडाला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल तीस यार्ड सर्कलच्या आत मिड विकेटवर उभा होता. गिलने मिड ऑफच्या दिशेने धाव घेत चेंडू पकडण्यासाठी हवेत जोरदार उडी घेतली. गिलने सुपरमॅन स्टाईलमध्ये उडी मारुन तो झेल हवेतच अचूक टिपला. या अप्रतिम झेलमुळे वेस्ट इंडीजला मोठा झटका बसला आणि भारताला पहिले यश मिळाले.

कुलदीप यादवची पहिल्या डावात महत्त्वाची भूमिका

भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी दमदार गोलंदाजी करत वेस्ट इंडीजचा पहिला डाव फार काळ टिकू दिला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडीजने चार विकेट्स गमावले होते. तिसऱ्या दिवसाच्या खेळात कुलदीप यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत एकट्याने 5 विकेट्स मिळवले आणि विंडीजचा डाव गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याशिवाय, रवींद्र जडेजाने तीन, तर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Purple Fest Goa: 'पर्पल फेस्ट'चा तिसरा अध्याय पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती!

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ

Renuka Devi History: यल्लम्मादेवी! नरसंहारातील पीडित समुदायांची तारणहार

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT