Quinton de Kock Century Dainik Gomantak
देश

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

Quinton de Kock Century: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना विशाखापट्टणम स्टेडियमवर खेळला जात आहे.

Sameer Amunekar

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना विशाखापट्टणम स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, डावाची सुरुवात करणारा दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने शानदार शतक झळकावत एक महत्त्वाचा टप्पा गाठला.

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये क्विंटन डी कॉकची बॅट शांत राहिली, ज्यामुळे तिसऱ्या सामन्यात मोठ्या डावांची अपेक्षा निर्माण झाली. विशाखापट्टणमच्या मैदानावर डी कॉकनेही आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आणि त्याने २३ वे एकदिवसीय शतक साजरे केले. डी कॉक आता भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बनला आहे, त्याने दिग्गज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे.

टीम इंडियाविरुद्ध क्विंटन डी कॉकचे हे सातवे एकदिवसीय शतक आहे. जागतिक क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. डी कॉकने याबाबतीत अॅडम गिलख्रिस्ट आणि कुमार संगकारा यांना मागे टाकले. गिलख्रिस्टने श्रीलंकेविरुद्ध सहा एकदिवसीय शतके झळकावली, तर संगकाराने भारताविरुद्ध सहा एकदिवसीय शतके झळकावली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत क्विंटन डी कॉक आता विराट कोहलीच्या बरोबरीत आहे. कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये ७ शतके झळकावली आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेटकीपर-फलंदाज म्हणून सर्वाधिक २३ शतके झळकावण्याच्या बाबतीत डी कॉक आता कुमार संगकाराच्या बरोबरीत आहे. एबी डिव्हिलियर्सनंतर तो भारतात एकदिवसीय सामन्यात १००० पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

मुरगावच्या SGPDA मच्छी मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता! डासांची पैदास वाढल्याने स्थानिकांचा संताप

Aquem Fire: आके येथील फास्ट फूड सेंटरला मध्यरात्री भीषण आग; 25 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT