भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तुफानी खेळी साकारत शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत तिने अवघ्या ६३ चेंडूत १२५ धावा ठोकल्या. तिच्या या खेळीत १७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
डावाच्या सुरुवातीपासूनच मानधनाने आक्रमक फलंदाजी केली. चौकार-षटकारांची आतषबाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दमछाक केली. तिच्या शतकामुळे भारतीय संघाने भक्कम सुरुवात केली आणि विजयाच्या आशा अधिक बळकट झाल्या.
विशेष म्हणजे, मागील सामन्यातही तिने ११७ धावांची शानदार खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला होता. त्यामुळे तिच्या फॉर्मबद्दल विशेष चर्चा सुरू आहे.
मानधनाने या मालिकेत सलग दोन शतके झळकावली आहेत. याआधी जून २०२४ मध्येही तिने सलग दोन सामन्यांत शतके केली होती. त्यामुळे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन वेळा सलग शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. महिला क्रिकेटमध्ये तिच्या नावावर १०८ सामन्यांत १३ शतके आणि १२ अर्धशतके अशी भक्कम नोंद झाली असून, आतापर्यंत तिने ४८८८ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या प्रथम फलंदाजी करत भारताला ४१२ धावांचे लक्ष्य दिले होते. डावखुऱ्या बेथ मूनीने तुफानी खेळ करत केवळ ७५ चेंडूत १३८ धावा ठोकल्या, ज्यात २३ चौकार आणि एक षटकार होता. तसेच एलिस पेरी आणि जॉर्जिया वॉल यांनी अर्धशतके झळकावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.