Income tax News, Income Tax department recruitment News, How to Apply for IT recruitment, Income Tax Recruitment 2022 News Dainik Gomantak
देश

आयकर विभागात नोकरीची संधी, कर निरीक्षक कर सहाय्यक पदांसाठी असा करा अर्ज

क्रीडा कोट्याअंतर्गत प्रतिभावान खेळाडूंना विशेष संधी देण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन करावयाचा आहे.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या प्रतिभावान खेळाडूंसाठी आयकर विभागात (Income Tax) नोकरीची मोठी संधी आहे. आयकर विभागाने मल्टी टास्किंग स्टाफसह विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहे. यासाठी आयकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज डाउनलोड करता येईल. त्यानंतर अर्ज ऑफलाइन करावा लागेल. प्राप्तिकर विभाग क्रीडा कोटा भरती 2022 साठी (Government Job) अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 आहे. नोटीसनुसार, प्राप्तिकर विभागामध्ये क्रीडा कोट्याअंतर्गत एकूण 24 पदे रिक्त आहेत. (Income Tax Recruitment 2022 News)

रिक्त पदांचा तपशील -

आयकर निरीक्षक - 1 पद

कर सहाय्यक - 5 पदे

मल्टी टास्किंग स्टाफ - 18 पदे

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता

आयकर निरीक्षक- कोणत्याही शाखेतील पदवीधर.

कर सहाय्यक- कोणत्याही शाखेतील पदवीधर/ अपीयर. तसेच प्रति तास 8000 डेटा एंट्रीचा स्पीड

मल्टी टास्किंग स्टाफ – 10वी पास.

वयोमर्यादा

आयकर निरीक्षक- 18 ते 30 वर्षे

कर सहाय्यक - 18 ते 27 वर्षे

मल्टी टास्किंग कर्मचारी - 18 ते 25 वर्षे

टीप- राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

क्रीडा क्षमता

1. उमेदवाराने कोणत्याही खेळाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेला असावा.

2. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज किंवा इंटर युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने आयोजित केलेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत भाग घेतलेला असावा.

3. अखिल भारतीय शालेय खेळ महासंघातर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत राज्य शालेय संघाकडून खेळलेला असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT