Gauri Lankesh Dainik Gomantak
देश

Gauri Lankesh प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे आदेश

गौरी लंकेश (Gauri Lankesh) हत्या प्रकरणातील आरोपी आरोपी मोहन नायकने हायकोर्टाच्या निकालाच्या आधारे जामीन मागितला आहे.

दैनिक गोमन्तक

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) उच्च न्यायलयाला पत्रकार गौरी लंकेश (Gauri Lankesh) यांच्या हत्याकांडातील आरोपीच्या जामीन याचिकेवर प्रभावित न होता या प्रकरणाचा निवाडा करावा असे सांगितले आहे. गौरी लंकेश यांच्या बहिण कविता लंकेश यांनी दाखल केलेल्या य़ाचिकेत आरोपी विरुद्ध संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा लागु करावा अशी मागणी केली आहे. या याचिकेत त्यांनी आरोपी मोहन नायक विरोधात असलेल्या आरोपांना फेटाळुन लावण्याची मागणी केली आहे. (Important order of the Supreme Court in the Gauri Lankesh case)

न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने कर्नाटक सरकार व इतरांना नोटिसा बजावत उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कवितांच्या याचिकेला उत्तर देण्यास सांगितले. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस हेदेखील या खंडपीठात होते.

कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी 15 जुलैपर्यंत तहकूब केली असुन, कविता यांच्या याचिकेनुसार 22 एप्रिल रोजी कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाच्या आधारे नायक यांनी जामीन मागितला आहे. कविता यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, विशेष तपास पथकाने (एसआयटी) खुलासा केला की नायक अनेक संघटित गुन्हेगारी प्रकरणांचा ही टोळी भाग आहेत. त्यांनी डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी बेंगळुरूमधील तिच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातही सरपंचांची थेट निवड व्हावी!

चिमुकलीवरील अत्याचारामुळे संतापाची लाट; टुगेदर फॉर म्हापसा संघटनेचे पालिकेला निवेदन, सुरक्षा उपायांच्या त्वरित अंमलबजावणी मागणी

Revolutionary Goans Party: 'आरजी' ये तेरा क्या हो गया?

VIDEO: 'मला विराट कोहलीसारखं खेळायचंय...' सेहवागच्या मुलाचे वक्तव्य चर्चेत; UAE विरुद्ध 160 धावांची खेळी करत दाखवला दम

नरकासुर पाहण्यास गेलेली बेपत्ता तरुणी सापडली; अपहरण नव्हे, मित्रासोबत गेल्याचे तरुणीकडून स्पष्ट

SCROLL FOR NEXT