एसबीआयच्या (SBI) 44 कोटी ग्रहकांसाठी (customers) बँकेकडून (Bank) एक सूचना जारी करण्यात आली आहे. एसबीआय कडून करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये आज (शनिवार) 10 जुलै रात्री 10.45 पासून 11 जुलै सकाळी 12.15 पर्यंत इंटरनेट बँकिंग (Internet banking), योनो, यूपीआय, योनो लाईट सेवा दुरुस्ती आणि देखभाल या करणास्तव बंद राहणार आहे. त्यामुळे ग्रहकांनी आपली महत्त्वाची कामे असल्यास डिजिटल व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करावे. (Important news for SBI customers, internet service will be closed on this day)
एसबीआयचे खातेदार सध्या चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. एका अहवालानुसार ग्राहकांना फिशिंगचा बळी बनवून चिनी हॅकर्स पैसे लुटत आहेत. हॅकर्सकडून एक दुवा ग्राहकांकडे सामायिक केला जातो. त्यानंतर त्यांना केवायसी अद्यावत करण्याचा सल्ला देण्यात येतो. त्या बदल्यात ग्रहकांना 50 लाखांची भेट देण्यात येत आहे. देशात सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआय आपल्या ग्रहकांची फसवणूक टाळण्यसाठी सतत प्रयत्नशिल असते. ग्राहकांनी आपला पासवर्ड बदलत राहण्याचे आवाहन देखील बँकेकडून करण्यात आले आहे. पासवर्ड बदलणे हे विषाणूंविरुध्द ज्याप्रमाणे लस काम करते तसेच आहे. यामुळे सायबर फसवणुकीपासून स्वत:चे संरक्षण करावे.
चिनी हॅकर्स एसएमएस व्हॉट्सअँपच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी एक लिंक तयार केली आहे, ज्यात ग्राहकांना केवायसी अद्यावत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यावर क्लिक करुन ग्राहक बनावट वेबसाईटवर जातो. तेथे आपल्याला पासवर्डसह लॉगिन करण्यास सांगितले जाते. जर एखाद्या ग्राहकाने चुकून लॉगिन केले तर त्याच्या खात्याचा तपशील चोरला जातो. हॅकर्सने ग्राहकाचा पासवर्ड बदलल्यास त्याच्या खात्यातून पैसे तो काढू शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.