Faridabad News  Dainik Gomantak
देश

गोव्याला पाठविण्यात येणारी 20 लाखांची अवैध दारू जप्त; तिघांना अटक

उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई

Akshay Nirmale

Faridabad News: उत्तरप्रदेशातील फरिदाबाद येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 20 लाख रूपये किंमतीची अवैध दारू जप्त केली आहे. ही दारू गोव्यात पाठविण्यात येणार होती. त्यापुर्वीच फरिदाबाद क्राईम ब्रँचच्या एनआयटी पथकाने ही कारवाई केली.

या विदेशी दारूसोबतच तीन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. दारूचे एकूण 102 बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत.

येथील गुन्हे शाखेचे प्रभारी नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, रोहन, पंकज आणि बिन्नू अशी आरोपींची नावे आहेत. रोहन हा सेक्टर 21 बी येथे राहतो. तर पंकज आणि बिन्नू हे आग्रा येथील रहिवासी आहेत. ते आग्रा येथील पंडित ट्रान्सपोर्टर कंपनीत ड्रायव्हर आहेत.

रात्री तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. तेव्हा डबुआ मंडी येथे अवैध दारूसह आरोपींना अटक करण्यात आली. कॅंटरमधून अवैध इंग्रजी दारूच्या 102 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

त्यापैकी 77 बॉक्स रेड लेबल, 21 बॉक्स ब्लॅक लेबलचे तर द ग्लेनलिव्हेटचे चार बॉक्स आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

ही दारू फरिदाबाद येथील रहिवासी असलेल्या करण नावाच्या ठेकेदाराची असून त्याला ही दारू गोव्यात पुरवठा करायची होती, असे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. गोव्यात अवैध दारू विकून मोठा पैसा कमावता यावा यासाठी येथून गोव्यात तस्करी करण्याची योजना होती.

आरोपी फरिदाबाद येथून दारू घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि अवैध दारूसह आरोपींना पकडले. करणचा आणखी एक साथीदार कमलजीत याचाही यात सहभाग असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.

आरोपी करण, रवींद्र आणि कमलजीत अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सखोल चौकशीसाठी आरोपी रोहनला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पंकज आणि बिन्नू या आरोपी चालकांना न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT