IGNOU New Course Dainik Gomantak
देश

IGNOU New Course: आता घरबसल्या मिळवा ‘भगवद्गीते’वर मास्टर डिग्री! इग्नूने सुरु केला नवा अभ्यासक्रम; आपत्ती व्यवस्थापन अन् कृषी खर्चावरही डिप्लोमा

IGNOU New Academic Programs: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

Manish Jadhav

IGNOU New Academic Programs: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यामध्ये 'भगवद्गीता' हा खास एम.ए. अभ्यासक्रम, आपत्कालीन व्यवस्थापनाचा डिप्लोमा आणि कृषी खर्च व्यवस्थापनाचा डिप्लोमा यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांमुळे विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना फायदा होणार आहे.

भगवद्गीतेवरील एम.ए. अभ्यासक्रम

दरम्यान, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने 'भगवद्गीता' या विषयावर दोन वर्षांचा एम.ए. (M.A.) अभ्यासक्रम सुरु केला. या अभ्यासक्रमाचा उद्देश भारतीय ज्ञान परंपरा, वेदांत, उपनिषदे, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक पैलू विद्यार्थ्यांना (Students) शिकवणे आहे. यासोबतच नैतिक मूल्ये, नेतृत्वाची तत्त्वे, संघर्ष निवारण, आणि सामाजिक-राजकीय पैलूंवरही यात भर दिला जाणार आहे. यापूर्वीच, विद्यापीठाने 'एम.ए. (वैदिक अभ्यास)' हा अभ्यासक्रम सुरु केला आहे, ज्यात वेद, वेदांग, उपनिषदे यांसारख्या विषयांचा समावेश आहे.

आपत्कालीन व्यवस्थापनाचा डिप्लोमा

आपत्कालीन व्यवस्थापन (Disaster Management) हा एक महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये पूर, भूकंप, त्सुनामी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना पद्धतशीरपणे कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान आणि कौशल्ये मिळतील. या अभ्यासक्रमाची खास गोष्ट म्हणजे, तो ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून लवचिक पद्धतीने उपलब्ध आहे, ज्यामुळे नोकरी करणाऱ्यांनाही तो करणे सोपे होईल. यामध्ये आपत्कालीन प्रतिबंध, मदतकार्य आणि पुनर्वसन या सर्व गोष्टी शिकवल्या जातात.

कृषी व्यवस्थापनाचा डिप्लोमा

शेतकऱ्यांना (Farmers) शेतीतील खर्च योग्य पद्धतीने कसा हाताळावा आणि नफा कसा वाढवावा, हे शिकवण्यासाठी 'कृषी खर्च व्यवस्थापनाचा डिप्लोमा' सुरु करण्यात आला आहे. इग्नूच्या कृषी विद्यालयाने 'इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया' (ICMAI) च्या सहकार्याने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. या डिप्लोमामुळे शेतीत खर्च व्यवस्थापन, उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. तसेच, इग्नूने कृषी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी 'कृषी व्यवसाय' या विषयावर पदव्युत्तर डिप्लोमाही सुरु केला आहे. आजच्या काळात शेती हा एक स्पर्धात्मक आणि व्यावसायिक व्यवसाय बनला आहे, त्यामुळे असे अभ्यासक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील.

गृहविज्ञान पदवी अभ्यासक्रम (बी.ए. इन होम सायन्स)

याशिवाय, इग्नूने 'गृहविज्ञान' (Home Science) मध्ये बी.ए. (B.A.) अभ्यासक्रमही सुरु केला आहे. यामध्ये मानवी विकास, पोषण आणि समुदाय विज्ञान यांसारख्या विषयांची माहिती सिद्धांत आणि कौशल्यांवर आधारित शिक्षणाद्वारे दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे ज्ञान मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

मुस्लिम राष्ट्रासाठी पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन लोकांवर अत्याचार करण्यात आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

IND vs PAK: ‘इतकी धुलाई करतील की...' पाकिस्तानी दिग्गजाला भारतीय बॅटर्स धास्ती; आशिया कपमधील भारत-पाक सामन्यावर मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT