mehbuba mufti Modi Dainik Gommantak
देश

दम असेल तर ताजमहलचं मंदिर बनवून दाखवा - मेहबूबा मुफ्ती

भाजप सरकारकडे जनतेला देण्यासारखे काहीच नाही म्हणून... - मेहबूबा मुफ्ती

दैनिक गोमन्तक

देशात धार्मिक ठीकाणी कोणती वास्तु होती आणि कोणती वास्तु असायला हवी यासाठी काही नागरिकांनी मोर्चे काढल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. आता ताजमहालबाबत वाद सुरू झाला आहे. भाजपा नेते रजनीश यांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करून ताजमहाल प्रत्यक्षात तेजो महाल असल्याचा दावा केल्याने वाद वाढत आहे. (If you have the courage, make it a temple of Taj Mahal - Mehbooba Mufti )

रजनीश यांनी ताजमहालच्या तळघरातील 22 खोल्या उघडण्याची मागणी केली आहे. या वादात आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी उडी घेतली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी ताजमहालबाबत भाजपला आव्हान दिलं आहे.

याबाबत त्या म्हणाल्या कि,“तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याचं मंदिर बनवून दाखवा. मग बघू किती लोकं हा देश बघण्यासाठी इथे येतात.” लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच हा वाद निर्माण केला जात असल्याचे आरोपही मेहबूबा मुफ्ती यांनी केला. मुघलांच्या काळात ताजमहाल, मशिदी, किल्ले बांधले गेलेत, त्या त्यांना खराब करायच्या आहेत. म्हणून त्यांच्या मागे पडून आहेत.

यातून काहीच मिळणार नाही.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. भाजपा सरकारकडे जनतेला देण्यासारखे काहीच नाही, असा टोला पीडीपी प्रमुखांनी लगावला आहे. बेरोजगारी, महागाई या सगळ्यात वाढ होत आहे. देशाची संपत्ती विकली जात आहे. यावर चर्चा करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

काय आहे वाद ?

इतिहासकार पीएन ओक यांच्या ‘ट्रू स्टोरी ऑफ ताज’ या पुस्तकावरून ताजमहालचा वाद सुरू झाला होता. या पुस्तकात ताजमहाल हे शिवमंदिर असल्याबाबत दावा करण्यात आला आहे. काही इतिहासकारांचा मते, ताजमहालमध्ये मुख्य समाधी आणि चमेलीच्या मजल्याखाली 22 खोल्या आहेत, ज्या बंद करण्यात आल्या आहेत. या 22 खोल्या उघडण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

SCROLL FOR NEXT