Indian Council of Medical Research (ICMR) Tweeter/ ICMR
देश

ICMR: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी देशातील दोन प्रमुख वैज्ञानिकांमधील मतभेद उघड

येत्या तीन ते चार आठवड्यात मोठया प्रमाणात कोरोना केसेस (Corona cases) वाढण्याची (ICMR) ने वर्तवली शक्यता.

दैनिक गोमन्तक

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे प्रमुख वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा (Dr. Samiran Panda) व प्रा. मणिंद्र अग्रवाल (Prof. Manaindra Agrawal) यांच्यामध्ये कोरोनाच्या (Corona) येणाऱ्या तिसऱ्या लाटेविषयी मतभेद असल्याचे उघड झाले आहे. डॉ. समीरन पांडांनी दावा केला की, ऑगस्ट महिना संपे पर्यंत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते(Covid 19 Third wave). डॉ. पांडांच्या अनुमानानुसार येत्या काळात रोजच्या रोज साधारणतः एक लाख पर्यंत केसेस सापडण्याची शक्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे (Corona cases),जर व्हायरसचे स्वरूप बदलले (Variant) तर तो फार घातक होण्याची शक्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भारतातील टिकाकरणाचा कमी असलेला रेट व शिथिल केलेले लॉक डाउन चे नियम या कारणांस्तव कोरोना केसेस मध्ये वृद्धी होऊ शकते. तिसऱ्या लाटेचा धोका मापण्यासाठी 'इंपीरियल कॉलेज लंडन (Imperial Collage London) व आईसीएमआर' (ICMR) गणितीय मॉडेलचा (Mathematical model) आधार घेईल. असे सांगण्यात आले.

आयआयटी, कानपुरचे (IIT, Kanpur) वैज्ञानिक प्रा. मणिंद्र अग्रवाल सांगितल्याप्रमाणे भारतासाठी कोरोनाची तिसरी लाट खतरनाक नसेल. भारतीय नागरिक आता हर्ड इम्युनिटीच्या जवळ असल्याने भारतीय लोकांना घाबरण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय सध्या डेल्टा व्हॅरिएन्ट (Delta variant) विरुद्ध लढण्यासाठी ज्या इम्युनिटीची गरज असते त्या ६५% इम्युनिटी भारतीयांमध्ये निर्माण झाली आहे, लवकरच भारतीय हर्ड (७५%) इम्युनिटीची लेव्हल वर पोहचतील, त्यामुळे भारतात (India) तिसरी लाट लवकर येणायची शक्यता कमी आहे. आणि आली तर भारतासाठी ही सर्वसाधारण असेल, प्रा.अग्रवाल यांनी सांगितले. अग्रवाल यांनी 'मैथमैटिकल मॉडल सूत्रा'च्या आधारे अभ्यास करून आपले मत मांडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT