WTC Final 2025 Dainik Gomantak
देश

WTC Final 2025: 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'चं विजेतेपद दक्षिण आफ्रिकेच्या झोळीत; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, मार्करमची खेळी ठरली गेमचेंजर

WTC Final 2025: टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेनं इतिहास रचला आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सनं पराभव केला आहे.

Sameer Amunekar

WTC Final 2025 South Africa vs Australia

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेनं इतिहास रचला आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सनं पराभव केला आहे. या सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियानं मजबूत पकड निर्माण केली होती, परंतु तिसऱ्या दिवसापासून सामना पूर्णतः पलटला. एडन मार्करमने आपल्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीनं संपूर्ण सामन्याचं चित्र बदलून टाकलं. दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद आपल्या नावे केलं.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन दिवसांमध्ये चांगल्या फलंदाजीसह वर्चस्व गाजवलं. त्यांचा वेगवान गोलंदाजीतला अनुभवही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर हावी होताना दिसला. मात्र, तिसऱ्या दिवशी मैदानात उतरलेल्या एडन मार्करमने आपल्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीनं संपूर्ण सामन्याचं चित्र बदलून टाकलं.

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद ५ विकेटनं आपल्या नावे केलं. ही आफ्रिकन क्रिकेटच्या इतिहासातली एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

एडन मार्करमची दमदार खेळी

दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर एडन मार्करामने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं . मार्करमनं शतक झळकावून मोठ्या सामन्यात स्वतःचं कौशल्य सिद्ध केलं असून, तो आयसीसी फायनल सामन्यामध्ये शतक ठोकणारा पहिला दक्षिण आफ्रिकन फलंदाज ठरला आहे.

मार्करमच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आफ्रिकन संघानं ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघावर मात करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद आपल्या नावे केलं.

दक्षिण आफ्रिकेची दमदार फलंदाजी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरादाखल, दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात फक्त १३८ धावा करूनच कोसळला.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं २०७ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर २८२ धावांचं लक्ष्य ठेवलं. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं चौथ्या दिवशी ५ विकेट गमावून हे लक्ष्य गाठलं. एडेन मार्करमनं १३६ धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार टेम्बा बावुमानं ६६ धावा केल्या.

२७ वर्षांनंतर जिंकली आयसीसी ट्रॉफी

कर्णधार टेंबा बवुमानं या सामन्यात साजेशी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आफ्रिकेनं तब्बल २७ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवलं आहे. यापूर्वी त्यांनी १९९८ मध्ये शेवटच्या वेळी आयसीसी स्पर्धा जिंकली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT