yashasvi jaiswal Dainik Gomantak
देश

ICC Test Ranking: आयसीसी कसोटी क्रमवारीत उलटफेर! यशस्वी जयस्वालला मोठा फटका, जो रुट पहिल्या स्थानी कायम; पंतने घेतली आघाडी!

ICC Test Rankings 2025:भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी आयसीसीने (ICC) नवीन कसोटी क्रमवारी (Test Ranking) जाहीर केली आहे.

Manish Jadhav

Latest ICC Test Ranking: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी आयसीसीने (ICC) नवीन कसोटी क्रमवारी (Test Ranking) जाहीर केली आहे. या क्रमवारीत पुन्हा एकदा मोठे उलटफेर आणि बदल दिसून आले आहेत. मात्र, इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट (Joe Root) याने आपले नंबर एकचे स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे, भारतीय युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) मोठा फटका बसला, तर ऋषभ पंतने (Rishabh Pant) एका स्थानाची झेप घेतली. कर्णधार शुभमन गिलला (Shubman Gill) मात्र यावेळी फारसा फायदा झालेला नाही.

जो रुट कसोटीतील नंबर 1 फलंदाज कायम

आयसीसीने 23 जुलैपर्यंत अपडेट केलेली कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट 904 रेटिंग गुणांसह नंबर एकच्या स्थानावर विराजमान आहे. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा केन विल्यमसन (Kane Williamson) दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याचे सध्या 867 रेटिंग गुण आहेत. इंग्लंडचाच हॅरी ब्रूक 834 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 816 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

ऋषभ पंतला एक स्थानाचा फायदा, जयस्वालला नुकसान

दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याने अलीकडे कोणताही सामना खेळला नसला तरी, त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 790 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या (Sri Lanka) कामेंदू मेंडिसलाही एका स्थानाचा फायदा झाला असून, तो 781 रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर गेला आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एका स्थानाची झेप घेत 776 रेटिंग गुणांसह सातवे स्थान पटकावले आहे.

या उलट, भारताच्या (India) यशस्वी जयस्वालला तीन स्थानांचे मोठे नुकसान झाले आहे. तो आता 769 रेटिंग गुणांसह थेट आठव्या स्थानावर घसरला आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) 754 रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर कायम आहे. दरम्यान, चौथ्या कसोटीत शानदार खेळी खेळणाऱ्या इंग्लंडच्या बेन डकेटला (Ben Duckett) पाच स्थानांचा मोठा फायदा झाला असून, तो 743 रेटिंग गुणांसह टॉप 10 मध्ये दाखल झाला आहे. त्याच्यासाठी टॉप 10 मध्ये प्रवेश करणे ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

SCROLL FOR NEXT