Tejas Fighter Jet Crash Dainik Gomantak
देश

Tejas Fighter Jet Crash: दुबई एअर शोमध्ये 'तेजस' लढाऊ विमान कोसळले; दुर्घटनेत वैमानिकाचा दुर्देवी मृत्यू

Tejas Fighter Jet Crash: दुबई येथे 'आंतरराष्ट्रीय दुबई एअर शो' मध्ये सहभागी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या 'तेजस' लढाऊ विमानाचा आज (शुक्रवार, 21 नोव्हेंबर) भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

Tejas Fighter Jet Crash: दुबई येथे 'आंतरराष्ट्रीय दुबई एअर शो' मध्ये सहभागी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या 'तेजस' लढाऊ विमानाचा आज (शुक्रवार, 21 नोव्हेंबर) भीषण अपघात झाला. हवाई सादरीकरण करत असताना स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हे विमान जमिनीवर कोसळले. या दुर्घटनेत विमानाचे वैमानिक गंभीर जखमी झाले आणि दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली.

भारतीय हवाई दलाचे स्पष्टीकरण

भारतीय हवाई दलाने या घटनेनंतर तात्काळ निवेदन जारी केले. हवाई दलाने या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. "आज दुबई एअर शोमध्ये हवाई सादरीकरणादरम्यान भारतीय हवाई दलाच्या 'तेजस' विमानाचा अपघात झाला. या अपघातात वैमानिक गंभीर जखमी झाला आणि दुर्देवाने मृत्यू झाला. या जीवीतहानीबद्दल भारतीय हवाई दल अत्यंत दु:खी असून, या दुःखद प्रसंगी आम्ही शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत," असे आयएएफच्या प्रवक्त्याने सांगितले. दुसरीकडे, हवाई दलाने अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तातडीने चौकशी आयोग स्थापन करण्याचे आदेश दिले.

ही दुर्घटना विमानतळाजवळ घडली. अपघातस्थळी मोठी आगी आणि त्यानंतर काळ्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरले, ज्यामुळे एअर शो पाहण्यासाठी जमलेल्या कुटुंबांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तात्काळ आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

युएई सरकारची प्रतिक्रिया

संयुक्त अरब अमिराती सरकारने या दुर्घटनेनंतर तातडीने प्रतिक्रिया दिली. अग्निशमन दलाच्या आणि आपत्कालीन पथकांनी त्वरित प्रतिसाद दिला असून, ते सध्या घटनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत, असे युएई सरकारने स्पष्ट केले.

'तेजस' लढाऊ विमान

'तेजस' हे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेले भारताचे स्वदेशी बनावटीचे मल्टी-रोल लढाऊ विमान आहे. एचएएलच्या वेबसाइटनुसार, 'तेजस' हे 4.5 व्या पिढीतील लढाऊ विमान आहे. ते आक्रमक हवाई समर्थन, क्लोज कॉम्बॅट आणि जमिनीवरील हल्ल्यांची मोहिम हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे विमान भूदल आणि नौदल अशा दोन्ही ऑपरेशन्ससाठी तयार केलेले आहे, ज्यामुळे ते भारताच्या सर्वात अनुकूल स्वदेशी प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. 'तेजस' हवाई दल आणि नौदलासाठी सिंगल-सीट फायटर व्हेरिएंट्स, तसेच दोन्ही सेवांसाठी डबल-सीट ट्रेनर आवृत्त्यांचा समावेश आहे.

'तेजस' चे सर्वात प्रगत व्हर्जन LCA Mk1A, लढाऊ क्षमता आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण अपग्रेडसह सज्ज आहे. यात AESA रडार, प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, डिजिटल नकाशा जनरेटर, स्मार्ट मल्टीफंक्शन डिस्प्ले आणि आधुनिक रडार अल्टिमीटर यांसारख्या अनेक अत्याधुनिक प्रणालींचा समावेश आहे, ज्यामुळे त्याची परिचालन कामगिरी मजबूत होते. दुबई एअर शोसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर 'तेजस' भारताच्या स्वदेशी सामर्थ्याचे प्रदर्शन करत असताना ही दुर्घटना घडल्यामुळे भारतीय हवाई दलात शोककळा पसरली आहे. चौकशी आयोगाच्या अहवालानंतरच अपघाताच्या नेमक्या कारणांचा उलगडा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT