Rajdhani Express Dainik Gomantak
देश

Rajdhani Express मध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन, चौकशीत धक्कादायक माहिती उघड...

Rajdhani Express: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असण्याची माहिती मिळाली होती पण ही अफवा होती.

दैनिक गोमन्तक

Rajdhani Express: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी (Police) खोल चौकशी केल्यास एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित अधिकाऱ्याने रेल्वेला उशीर करण्यासाठी पीसीआर कमांड रूमला रेल्वेमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिल्याची कबूली दिली आहे. यामुळे अधिकाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.

शनिवारी संध्याकाळी 4.55 वाजता राजधानी एक्स्प्रेस (Rajdhani Express) दिल्लीवरून मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना होणार होती. यापूर्वी सात मिनिटे पीसीआर कमांड रूमने पोलिसांना बॉम्ब कॉलची माहिती दिली.

रेल्वेत (Railway) बॉम्ब असल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर ताबडतोब रेल्वे आणि मध्य जिल्ह्याच्या बॉम्ब निकामी पथकाचे पाचारण करण्यात आले. रेल्वे संरक्षण दलही या कारवाईत सामील झाले.

परंतु, तपासात कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही. त्यानंतर रेल्वेत बॉम्ब असल्याची माहिती देणाऱ्या फोनची चौकशी केली असता हा फोन भारतीय वायु दलाचे अधिकारी सुनील सांगवान यांनी केल्याची माहिती उघड झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगवान हे राजधानी एक्स्प्रेसमधून दिल्लीहून मुंबईला जाणार होते. पण त्यांना उशीर झाल्याने त्यांनी रेल्वेत बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. कॉलर कोच बी-9 सीट क्रमांक-1 वरून शोधण्यात आला.

त्याच्या भारतीय वायुसेनेच्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली. पीसीआर कॉल करण्यासाठी वापरलेला मोबाईलही (Mobile) जप्त करण्यात आला आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये तो दारूच्या नशेत असल्याची पुष्टी झाली. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT