Satyendra Kumar Jain Dainik Gomantak
देश

कोरोना झाल्याने माझी स्मरणशक्ती गेली - मंत्री सत्येंद्र जैन

मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांची चौकशीदरम्यान दिलं उत्तर

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून भारतात विशेषत: महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांनी चौकशीसाठी अनेक दिग्गज नेत्यांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या महिन्यात अटक केली आहे. दरम्यान, सत्येंद्र जैन यांनी ईडीच्या सुनावणीवेळी धक्कादायक दावा केला आहे की, मला कोरोना झाल्याने माझी स्मरणशक्ती गेली आहे. (I lost my memory because of Corona - Minister Satyendra Jain )

दिल्लीच्या न्यायालयात ईडीने सत्येंद्र जैन यांच्या तपासाबद्दल माहिती दिली. त्यात ईडीने म्हटलं की, प्रश्न विचारल्यानंतर सत्येंद्र जैन यांनी सांगितलं की, "मला कोविड झाला आणि त्यामुळे माझी स्मरणशक्ती गेली आहे." ईडीने सत्येंद्र जैन यांच्याकडे काही कागदपत्रांबाबत चौकशी केली होती. मनी लाँड्रिंगचे पैसे मिळणाऱ्या ट्रस्टशी सत्येंद्र जैन यांचे काय संबंध आहेत? ते त्या ट्रस्टचे सदस्य आहेत का यासंबंधी प्रश्न विचारले जात होते.

सत्येंद्र जैन यांना ईडीने 30 मे रोजी अटक केली होती. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचे आणि मनी लाँड्रिंगचे आरोप होते. ईडीने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. ईडीने दावा केला होता की, केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सत्येंद्र जैन यांनी पत्नी आणि मुलींच्या नावावर 16 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांनी मात्र सत्येंद्र जैन यांच्याविरोधातील गुन्हा खोटा असल्याचं म्हटलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rice Farming Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

Goa Stunt Viral: रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

Smriti Mandhana Record: एशियन गेम्सच्या महामुकाबल्यात स्मृती मानधानाचा विश्वविक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारी ठरली पहिलीच महिला फलंदाज

Viral News: कायद्याचं शिक्षण घेतलं, पण करिअर निवडलं कुत्रे फिरवण्याचं; दिवसाला कमावते तब्बल 50 हजार, वाचा तरूणीची अनोखी स्टोरी

संपादकीय: राजकीय हस्तक्षेपाचा अभियंत्यांना फटका

SCROLL FOR NEXT