Hyderabad youth gone missing in goa, Goa Crime News updates, Hyderabad Man Missing in Goa Dainik Gomantak
देश

गोव्यात अपहरणानंतर शारीरिक छळ, हैदराबादच्या तरुणाची आपबिती

अंगावर व्रण आढळल्याने पोलिसांच्या सूचनेनुसार वैद्यकीय तपासणी, पोलीस तपास सुरु

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात गायब झालेला तरुण नुकताच माघारी हैदराबादला परतला. घरी परतल्यावर त्याच्या अंगावर संशयास्पद खुणाही सापडल्या आहेत. घाबरलेल्या तरुणाने आधी काही सांगण्यास नकार दिला होता. मात्र आता या तरुणाने गोव्यात घडलेली आपबिती कथन केली आहे.

हैदराबादमध्ये (Hyderabad) राहणारा 30 वर्षीय तरुण गोव्यात पर्यटनासाठी आला होता. गोव्यात फिरताना आपलं अज्ञात लोकांनी अपहरण केलं आणि त्यानंतर शारीरिक छळही केल्याचं तरुणाने सांगितलं आहे. डांबून ठेवलेल्या ठिकाणाजवळ असलेल्या तलावात उडी टाकून आपला जीव वाचवल्याचं तरुणाने सांगितलं आहे. घरी परतण्यासाठी पैसेही शिल्लक नसलेल्या तरुणाला पोलिसांनी (Police) तिकिटासाठी आर्थिक मदत केल्याचं सांगत त्याने घडलेला सारा वृत्तांत कथन केला आहे.

तीन दिवसांमागे हैदराबादमध्ये दाखल झालेल्या श्रीनिवास नामक तरुणाने ऑटोरिक्षा, मेट्रो मिळेल ते साधन वापरत घर गाठलं. मात्र आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगण्यासाठी त्याच्यात त्राणच उरले नव्हते. अखेर घरच्या लोकांशी बोलल्यानंतर सावरलेल्या तरुणाने सारा वृत्तांत कथन केला. मार्च 23 रोजी गोव्यात (Goa) आपल्या पाच मित्रांसह दाखल झालेला तरुण पुढच्याच दिवशी अचानक गायब झाला होता. याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. हैदराबादमध्ये घरी पोहोचल्यानंतर त्याच्या पोटावर व्रण दिसले. त्यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार श्रीनिवासची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मडगावमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम? पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत केली पाहणी, काय उघडकीस आलं?

Goa Today's News Live: रणजीत सुयश प्रभूदेसाईचे दणदणीत शतक, 41 सामन्यात झोडली सात शतकं

Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

अग्रलेख: 'वाळू माफिया' अनावर झाल्यास लोकांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? कुंपणच शेत खाणारी परिस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; आरोप निश्चित करण्याचे म्हापसा कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT