Hyderabad To Goa Trip Dainik Gomantak
देश

Hyderabad To Goa: एक प्रवास बारा भानगडी! कोणाची मुलाखत, कोणाचे महत्वाचे काम, 25 जणांची समस्याग्रस्त गोवा ट्रीप

Hyderabad To Goa Travel Experience: पोलिसांनी चालकाला पोलिस स्थानकात नेले खरे पण, तो तिथून फरार झाला.

Pramod Yadav

Hyderabad To Goa Travel Experience

लांबचा प्रवास म्हटलं की काही ना काही अनपेक्षित घटना घडत असतात, अर्थात प्रत्येकवेळीच असं होईल असं नाही पण, अनेकदा काही विचित्र अनुभव येतात. मियापूर, हैद्राबाद येथून गोव्यात येणाऱ्या 25 प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागला.

महत्वाची बाब म्हणजे यात काही जण मुलाखत देण्यासाठी तर काहीजण महत्वाच्या कामानिमित्त गोव्यात येत होते.

झालं असं की मियापूर, हैद्राबाद येथून 25 प्रवासी खासगी बसद्वारे गोव्यात येत होते. प्रवाशांना घेण्यासाठी बस ठरलेल्या गंतव्य स्थानवर येणे अपेक्षित होते पण, प्रवशांना स्वखर्चाने दुसऱ्या पिकअप पॉईंटपर्यंत जावे लागले.

प्रवासी बसमध्ये बसले खरे पण बसमध्ये एसी आणि इतर सुविधा नसल्याने प्रवाशांनी चालकाकडे याबाबत तक्रार केली. पण, रागावलेल्या चालकाने चक्क रस्त्याकडेला गाडी थांबवून पुढे न जाण्याची भूमिका घेतली आणि तो प्रवाशांसोबत हुज्जत घालू लागला.

यातील एका प्रवाशाने 100 नंबरला फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी चालकाला पोलिस स्थानकात नेले खरे पण, तो तिथून फरार झाला.

प्रवाशांना मात्र तिथेच ताटकळत थांबावे लागले, अखेर संतापलेल्या प्रवाशांनी प्रवासी कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. बसमधील एक प्रवासी चरण वर्मा गोवा तटरक्षक दलासाठी मुलाखत देण्यासाठी निघाला होता. अखेर त्याला तातडीने फ्लाईट बुक करावी लागली आणि त्याने गोवा गाठले.

यातील काही प्रवासी इतर महत्वाच्या कामांसाठी गोव्यात येत होते. मात्र, चालकाच्या आडमुठ्या वागण्याचा त्यांना फटका बसला. मियापूर ते गोवा या प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाने दोन हजार रुपये तिकीटासाठी दिले होते. दरम्यान, फसवणूक प्रकरणात कंपनीविरोधात सक्त कारवाई करावी, अशी मागणी सर्व प्रवाशांनी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT