Cyber Crime Dainik Gomantak
देश

'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 81 वर्षीय वृद्धाला 7 कोटींचा गंडा, तोतया मुंबई पोलिसानं ड्रग्ज तस्करीची भीती दाखवून लुटलं; सायबर ठगांचा सुळसुळाट!

Digital Arrest Scam Hyderabad: देशभरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता सुशिक्षित आणि ज्येष्ठ नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली लक्ष्य केले जात आहे.

Manish Jadhav

Digital Arrest Scam Hyderabad: देशभरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता सुशिक्षित आणि ज्येष्ठ नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली लक्ष्य केले जात आहे. हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली, जिथे एका 81 वर्षीय वृद्धाला अमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्यात अडकवण्याची धमकी देऊन तब्बल 7.12 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. तेलंगणा सायबर सुरक्षा ब्युरोने या प्रकरणाचा तपास सुरु केला असून या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणुकीची मालिका 27 ऑक्टोबर 2025 रोजी सुरु झाली. पीडित वृद्धाला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण एका नामांकित कुरियर कंपनीचे प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगितले. त्याने वृद्धाला घाबरवले की, त्यांच्या नावाने मुंबईहून थायलंडला एक पार्सल पाठवण्यात आले. या पार्सलमध्ये 'एमडीएमए' सारखी अमली द्रव्ये, बनावट पासपोर्ट आणि काही डेबिट-क्रेडिट कार्डे सापडली आहेत. हे ऐकून वृद्ध व्यक्ती प्रचंड घाबरली. भामट्याने पुढे सांगितले की, हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने त्यांनी हे पार्सल रोखून धरले असून तपास मुंबई पोलिसांकडे सोपवले आहे.

'मुंबई पोलीस' बनून केला बनावट तपास

काही वेळातच दुसऱ्या एका व्यक्तीने वृद्धाला फोन केला आणि आपण मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे भासवले. या तोतया पोलीस अधिकाऱ्याने वृद्धावर ड्रग्ज तस्करी, मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप केला. "तुमचे बँक खाते गुन्हेगारी कामासाठी वापरले जात आहे," असे सांगून या वृद्ध व्यक्तीला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवण्यात आली. तसेच, हे प्रकरण अतिशय गोपनीय असून याबद्दल कुणालाही माहिती दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी ताकीद देण्यात आली.

दोन महिन्यांत 7.12 कोटींची वसुली

भामट्यांनी वृद्धाचा विश्वास संपादन करण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली. त्यांनी सांगितले की, "जर तुम्हाला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचे असेल, तर तुमच्या खात्यातील सर्व रक्कम आमच्या व्हेरिफिकेशन खात्यात ट्रान्सफर करा. तपास पूर्ण झाल्यावर आणि तुम्ही निर्दोष आढळल्यावर हे पैसे तुम्हाला परत मिळतील." घाबरलेल्या वृद्धाने आपल्या आयुष्याची सगळी बचत 7.12 कोटी रुपये दोन महिन्यांच्या कालावधीत भामट्यांनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केली.

खुलासा कसा झाला?

7.12 कोटी रुपये उकळल्यानंतरही सायबर गुन्हेगारांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा एकदा वृद्धाकडे 1.2 कोटी रुपयांची मागणी केली. जेव्हा वृद्धाकडे पैसे संपले आणि वारंवार पैशांची मागणी होऊ लागली, तेव्हा त्यांना संशय आला. 30 डिसेंबर रोजी त्यांनी तेलंगणा सायबर सुरक्षा ब्युरोशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. तोपर्यंत या वृद्धाने आपली 7.12 कोटी रुपयांची मोठी रक्कम गमावली होती.

'डिजिटल अरेस्ट'पासून असा करा बचाव

पोलिसांनी स्पष्ट केले की, कोणतीही सरकारी यंत्रणा किंवा पोलीस विभाग कधीही कोणालाही व्हिडिओ कॉल किंवा फोनवर 'अरेस्ट' करत नाही किंवा पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी करत नाही. जर तुम्हाला असे संशयास्पद फोन आले, तर त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: 1.41 कोटींचा गंडा! नागपूरच्या 23 वर्षीय 'मास्टरमाईंड'ला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली वाळपईच्या एकाला लुटलं

Panchank Rajyog 2026: धनु राशीत मंगल-वरुणचा मिलाफ! 'पंचांक योग' उजळवणार 'या' 3 राशींचं नशीब; 7 जानेवारीपासून सुवर्णकाळ

"उद्या भारतासोबतही असं घडू शकतं..."; निकोलस मादुरोंच्या अपहरण प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर पेटला वाद VIDEO

Kartik Aaryan: गोव्यातील सुट्ट्या अन् आता स्नॅपचॅट वाद! कार्तिक आर्यनच्या 'त्या' व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ; काय नेमकं प्रकरण?

मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

SCROLL FOR NEXT