Karnataka High Court Dainik Gomantak
देश

''पतीच्या नातेवाईकांना पुराव्याशिवाय अटक केली जातेय'', या प्रकरणात हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Karnataka High Court: खंडपीठाने म्हटले की, ''हे लक्षात घेण्यासारखे आहे की आयपीसीच्या कलम 498A चा आजही गैरवापर होत आहे. पती-पत्नीमधील किरकोळ वादही न्यायालयापर्यंत पोहोचत आहेत.

Manish Jadhav

Karnataka High Court: आजही कोणत्याही पुराव्याशिवाय सासरच्या लोकांवर पत्नी किंवा सुनेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत, अशी टिप्पणी कर्नाटक उच्च न्यायालयाने केली आहे. पती-पत्नीमधील किरकोळ वादांची प्रकरणेही न्यायालयापर्यंत पोहोचत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. खंडपीठाने म्हटले की, ''हे लक्षात घेण्यासारखे आहे की आयपीसीच्या कलम 498A चा आजही गैरवापर होत आहे. पती-पत्नीमधील किरकोळ वादही न्यायालयापर्यंत पोहोचत आहेत. इतकंच नाही तर पतीशिवाय सासरच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्यात गोवलं जातं. अनेक वेळा इतर कुटुंबीयांवरही गुन्हे दाखल केले जातात.''

खंडपीठाने पुढे म्हटले की, 'बऱ्याच वेळा पती-पत्नीच्या भांडणात कुटुंबातील सदस्यांची भूमिका काय होती, याचा पुरावाही मिळत नाही. असे असतानाही गुन्हे दाखल होतात. न्यायमूर्ती सीएम जोशी यांच्या खंडपीठाने सांगितले की, काही वेळा भांडणाचे कारण वेगळे असते, मात्र अन्य आरोपांवर तक्रार दाखल केली जाते. असे घडते कारण कलम 498A अंतर्गत गुन्हा दाखल करुन पती आणि त्याच्या कुटुंबाला तुरुंगात धाडले जाईल. मात्र, संबंधित प्रकरणात न्यायालयाने महिलेचा पती आणि त्याच्या आईविरुद्धची कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महिलेच्या तक्रारीची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, ही तक्रार प्रामुख्याने पती आणि त्याची आई म्हणजेच सासू यांच्या विरोधात आहे. पण कुटुंबातील इतर काही सदस्यांविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली होती, जे हे जोडपे राहत असलेल्या मुंबईतही राहत नव्हते. न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात पती आणि सासू यांच्याशिवाय इतर 8 जणांविरुद्धही छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र चौकशीत त्यांच्याबाबत कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.

दरम्यान, पती आणि सासू व्यतिरिक्त इतर 8 जणांनी कसा छळ केला याचा उल्लेख एफआयआरमध्ये नाही. अशाप्रकारे उच्च न्यायालयाने पती आणि सासू-सासऱ्यांव्यतिरिक्त इतर 8 जणांविरुद्धच्या कारवाईला स्थगिती दिली. मात्र याप्रकरणी आरोपी क्रमांक 1 आणि 2 विरुद्ध खटला चालवावा, असे न्यायालयाने म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT