Indian Army Dainik Gomantak
देश

अशी केली जाईल 'अग्निपथ' योजनेअंतर्गत 'अग्निवीरांची' भरती?

केंद्र सरकारने तीनही सेवांदलांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी 'अग्निपथ' योजना आणली आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने तीन सेवांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी 'अग्निपथ' योजना आणली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्यात येणार आहे. अशा तरुणांना 'अग्नवीर' म्हटले जाईल. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर 25 टक्के तरुणांना सैन्यात कायम केले जाईल. यंदा या योजनेअंतर्गत 46 हजार तरुणांची भरती होणार आहे. (Agnipath Scheme Recruitment)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ योजनेमुळे भारतीय तरुणांना सैन्यात सेवा करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे भारताची सुरक्षाही मजबूत होईल. यावर्षी 46 हजार अग्निवीरांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना भरती करता येईल. सैन्यात भरतीचे काम ९० दिवसांत सुरू होईल.

पण ही भरती कशी होणार?

केंद्र सरकारने सांगितले की तीन सेवांसाठी नोंदणी ऑनलाइन केंद्रीकृत प्रणालीद्वारे केली जाईल. भरतीसाठी मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थांमध्ये विशेष रॅली आणि कॅम्पस मुलाखती घेतल्या जातील. यासाठी वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असेल. सैन्यात भरती होणाऱ्या सर्व तरुणांच्या शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्याही घेतल्या जातील. 10वी आणि 12वी उत्तीर्ण युवक यासाठी अर्ज करू शकतात.

चार वर्षांनी काय?

राजनाथ सिंह म्हणाले की, 4 वर्षांनंतर जेव्हा हे तरुण नागरी कामात जातील, तेव्हा त्यांच्यामध्ये एक शिस्त येईल, जी देशासाठी मोठी संपत्ती ठरेल. चार वर्षांनंतर 75% अग्निवीरांना सेवेतून मुक्त केले जाईल. केवळ 25% तरुण सेवेत राहतील. म्हणजेच 46 हजारांपैकी केवळ साडेअकरा हजार तरुण लष्कराशी जोडले जातील.

आता यासाठी निवड कशी होणार? तर यासाठी तरुणांची चार वर्षांची कामगिरी पाहायला मिळणार आहे. या संदर्भात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे येणे बाकी असल्याचे सरकारने म्हटले आहे.

सध्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत 10 वर्षांसाठी तरुणांची सैन्यात भरती केली जाते. त्याची मर्यादा 14 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

पगार किती मिळेल?

अग्निवीरांना पहिल्या वर्षी 30 हजार रुपये पगार मिळणार असून त्यापैकी 21 हजार रुपये हातात येतील. दुसऱ्या वर्षी 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36 हजार 500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार पगार मिळणार आहे.

सेवेतून मुक्त झाल्यानंतर अग्निवीरांना 'सर्व्हिस फंड पॅकेज' अंतर्गत 11.71 लाख रुपये मिळतील. विशेष म्हणजे यावर कोणताही आयकर लागणार नाही.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार या तरुणांना पेन्शन किंवा ग्रॅच्युईटी दिली जाणार नाही. मात्र, अग्निवीरांना चार वर्षांसाठी 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Schedule: प्रतीक्षा संपली! 'आशिया कप'चं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT