corona vaccine  Dainik Gomantak
देश

जाणून घ्या केंद्र सरकार किती रुपयांत खरेदी करते Vaccine

देशातील काही भागात लसीची (Vaccine) कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) या लसीसाठी नवे आदेश दिले आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील काही भागात लसीची (Vaccine) कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) या लसीसाठी नवे आदेश दिले आहे. कोविशील्ड (Covishield) आणि कोवैक्सीनसाठी 66 करोडची ऑर्डर देण्यात आली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान लस (Vaccine) पुरवठा होणे अपेक्षित आहे. या ऑर्डरमध्ये 37.5 कोटी डोस कोवाशील्डचे असून 28.5 कोवैक्सीनचे आहेत. खाजगी रुग्णालयांना सुमारे 22 कोटी डोस देण्यात येणार आहेत. तसेच अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार या नवीन ऑर्डर लसीच्या सुधारित किंमतींनवर देण्यात आले आहेत. यात कोविशील्ड 215 रुयए तर कोवैकसिन 225 रुपये प्रति दराने भरण्यात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार आम्ही लवकरच दररोज 50 कोटी डोस देण्याच्या मार्गावर आहे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी हे खूप गरजेचे आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत देशभरात सुमारे 40 कोटी डोस दिले आहेत. केंद्र सरकारने (Central Government) जुलै महिन्यात 13.5 कोटी डोसची उपलब्धता दर्शवली होती. केंद्र सरकार यापूर्वी 150 रुपये दराने डोसच्या आधारावर लस खरेदी करत होता. 12 जूनपासून बदललेली खरेदी योजना राबविल्यानंतर लसीच्या किंमतींत सुधारणा करण्याचे संकेत सरकारने दिले होते .

उत्पादनात वाढ करणे गरजेचे आहे

आरोग्य मंतरल्याचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, अधिक लासीचे डोस घेण्याबाबत राज्यांच्या चिंतेच आम्ही कौतुक करीत असतानाही, भारत सरकार लसीच्या उत्पादनात कसे वाढवीत आहे याचे आपणही कौतुक केले पाहिजे. लसीचे जास्तीत जास्त डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात येतील याची खात्री सरकार करीत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 25 जून रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात देलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, डिसेंबरपर्यंत देशात 1.35 अब्ज लसीचे डोस उपलब्ध होतील, जे प्रौढ लोकांसाठी पुरेसे असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT