Home Minister Amit Shah calls police commissioners meeting  Dainik Gomantak
देश

देशातील 'या' राज्यांत हाय अलर्ट; अमित शहांची पोलीस प्रमुखांसोबत बैठक

गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि रात्री 10 पर्यंत चालणार आहे.

दैनिक गोमन्तक

गृहमंत्री (Home Minister) अमित शहा (Amit Shah) आज सर्व राज्यांच्या डीजीपी (DGP) आणि पोलीस प्रमुखांसोबत (Police commissioner) बैठक घेणार आहेत. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि रात्री 10 पर्यंत चालणार आहे. या बैठकीचा मुख्य अजेंडा देशातील आणि राज्यातील सुरक्षा आणि समन्वय असणार आहे.

अमित शहा यांच्या आजच्या या बैठकीला खूप महत्वाचे मानले जात आहे कारण दहशतवादी हल्ल्याच्या षडयंत्रासंदर्भात सातत्याने येणाऱ्या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. अलीकडच्या काळात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकी आणि खोऱ्यात बाहेरील लोकांच्या हत्यांच्या घटनांनीही डोकेदुखी वाढवली आहे. दरम्यान, आसाम पोलिसांनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर येत्या सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता देखील सुरक्षा एजन्सीने वर्तवली आहे.

राजधानी हाय अलर्टवर

राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याच्या कटाबद्दल दिल्ली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आहे, त्यानंतर दिल्लीतील पोलिसांना सतर्क करण्यात आले असून बाजारपेठा, मॉल आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सर्व संशियत ठिकाणी पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आजकाल पोलीस भाड्याने राहणाऱ्या लोकांची अचानक तपासणी करत आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी वाहन तपासणी केली जात आहे तर राजधानीला छावणीचे स्वरूप आले आहे.

आसामध्येही हल्ल्याची शक्यता

अल कायदाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये काश्मीर आणि आसाममध्ये जिहाद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, त्यानंतर आसाम पोलीस विभागाने खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांच्या पोलिसांना सतर्क केले आहे. गुप्तचर माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना अल कायदा एकत्र मिळून मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. माहितीनुसार, ते लष्करी तळ आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करू शकतात. गुप्तचरानुसार, दहशतवादी बॉम्ब किंवा आयईडीने हल्ला करू शकतात. ही भीती लक्षात घेता राज्यभरात पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानात शिजतोय मोठा कट

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठीशी असलेल्या दहशतवादी संघटनांनी भारतात अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचला आहे. भारतीय गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी 200 भारतीय लोकांना संपवण्यासाठी एक हिटलिस्ट तयार केली आहे. हे पाहता एजन्सी हाय अलर्टवर आहेत . वास्तविक मागील काही दिवसांपासून , दहशतवादी संघटना काश्मीरमधील लष्कर आणि बाहेरील लोकांना लक्ष्य करून खोऱ्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मिरी पंडित, राजकारणी आणि उद्योगपतींसह इतर अनेक लोक त्यांच्या यादीत समाविष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT