Historian Irfan Habib Dainik Gomantak
देश

Historian Irfan Habib: ''भले औरंगजेबाने मंदिर पाडून मशीद बांधली, पण आता...'', काशी-मथुरा वादावर इतिहासकार इरफान हबीब म्हणाले

Kashi Mathura Mandir And Masjid Dispute: देशातील प्रसिद्ध इतिहासकारांपैकी एक अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्राध्यापक इरफान हबीब यांनी पुन्हा एकदा ज्ञानवापी आणि मथुरेच्या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे.

Manish Jadhav

Historian Irfan Habib React On Kashi Mathura Mandir And Masjid Dispute:

देशातील प्रसिद्ध इतिहासकारांपैकी एक अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्राध्यापक इरफान हबीब यांनी पुन्हा एकदा ज्ञानवापी आणि मथुरेच्या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे. इरफान हबीब यांनी सांगितले की, ''300 वर्षांपासून तिथे मशीद आहे. औरंगजेबाने मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्या असतील, पण आता त्या पाडून पुन्हा मंदिरे बांधली जावीत का? तेही देशात संविधान लागू असताना.''

हबीब पुढे म्हणाले की, 'जेव्हा इथे अशा घटना घडतात तेव्हा अशा कृत्यांवर जग हसते. औरंगजेबाने जे काम केले तेच काम आता तुम्ही करणार आहात. अशा परिस्थितीत तुमच्यात आणि औरंगजेबामध्ये फरक काय? पुरातत्व विभागाचा विचार केला तर हे सर्व इतिहासात (History) आधीच लिहिलेले आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख अनेक पारशी पुस्तकांमध्ये आढळतो. पण 300 वर्षांपासून असलेली वास्तू पाडून पुन्हा मंदिर बांधणार का, हा मुद्दा आहे.''

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे एमेरिटस प्रोफेसर इरफान हबीब म्हणाले की, ''काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या जागी औरंगजेबाने मशिदी बांधल्या, पण गेल्या 300 वर्षांपासून तिथे मशीद आहे हेही खरे आहे. आता अशा परिस्थितीत मशिदी पाडून मंदिरे पुन्हा बांधली जावीत का? असे झाल्यास ते अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी ठरेल. कारण संविधान लागू असतानाही आपण असे प्रकार केले तर औरंगजेब आणि सरकारमध्ये काय फरक राहील.''

इरफान हबीब यांच्या मतानुसार, औरंगजेबाने जे केले ते सरकारला करायचे आहे का? काही लोक ताजमहालबद्दलही चुकीची वक्तव्ये करतात. ही सर्व निरुपयोगी चर्चा आहे. काशीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील (Mathura) शाही ईदगाह प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु आहे. नुकतेच ज्ञानवापी येथील एसएआय सर्वेक्षणानंतर न्यायालयाचा निर्णयही आला आहे. ज्यामध्ये ज्ञानवापीच्या जागी मोठे हिंदू मंदिर असल्याचा पुरावा मिळत असल्याचा दावा केला जात आहे. सध्या न्यायालयाने ज्ञानवापी व्यासजींच्या तळघरात पूजेला परवानगी दिली आहे.

दरम्यान, या सगळ्यामध्ये इतिहासकार इरफान हबीब यांचे वक्तव्य आले आहे. ज्यात ते म्हणाले की, औरंगजेबाने जे केले ते 300 वर्षांनंतर दुरुस्त करण्याचे कोणतेही समर्थन नाही. 1947 ची परिस्थिती कायम ठेवावी लागेल. काही बदल करायचे असतील तर कायदा बदलावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT