hindon airport flight cancel Dainik Gomantak
देश

Goa Flight Cancelled: हिंडन ते गोवा विमानसेवा रद्द; ऐनवेळी प्रवाशांचे नियोजन बिघडले, एअर इंडिया एक्सप्रेसवर संताप

Hindon to Goa flight cancelled: हिंडन विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांच्या रद्द होण्याचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये

Akshata Chhatre

गाझियाबाद: हिंडन विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांच्या रद्द होण्याचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. सोमवारी (दि.४) पुन्हा एकदा पटना, कलकत्ता, भुवनेश्वर, बंगळूरू, जयपूर आणि गोवा इथे जाणाऱ्या सहा विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला असून, त्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसने सोमवारी दुपारी ३ वाजेच्या आधीची सर्व उड्डाणे रद्द केली होती. त्यानंतरच्या निर्धारित वेळेनुसार असलेली उड्डाणे मात्र सामान्यपणे पार पडली. विमाने रद्द झाल्याची माहिती काही प्रवाशांना रविवारी रात्री तर काहींना सोमवारी सकाळी मिळाली. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. केवळ एका आठवड्यापूर्वीही अशाच कारणांमुळे विमानतळावर मोठा गोंधळ झाला होता.

या संदर्भात एनबीटीने एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. हिंडन विमानतळाचे संचालक म्हणाले की, एकाच वेळी इतकी विमाने का रद्द करण्यात आली, याबाबत त्यांनाही कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, विमानतळ प्रशासन विमानतळाच्या विस्तारासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करत आहे, तसेच संरक्षण मंत्रालयासोबतही धावपट्टी आणि पार्किंगच्या जागेबद्दल बोलणी सुरू आहेत.

प्रवाशांनी या गोंधळाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवासी डॉ. विकास कुमार यांनी सांगितले की, त्यांची फ्लाइट रद्द झाल्यानंतर एका खासगी नंबरवरून फोन करून रिफंडसाठी त्यांच्याकडून माहिती मागितली जात होती. त्यांनी एअरलाईनच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक केल्याने ही पद्धत त्यांना संशयास्पद वाटली. भुवनेश्वरला जाणाऱ्या अनिरुद्ध यांनी सांगितले की, सकाळी ९:३० ची फ्लाइट रद्द झाल्याची माहिती त्यांना केवळ एका ईमेलद्वारे देण्यात आली.

विमाने रद्द होण्यासोबतच बुकिंगमध्येही अडचणी येत आहेत. शालीमार गार्डन येथील रहिवासी अशोक शाह यांनी सांगितले की, गेले तीन दिवस ते हिंडनहून जयपूरला जाणाऱ्या फ्लाइटचे तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तांत्रिक कारणांमुळे बुकिंग होत नाहीये. वेबसाइटवर 'नो रूट फाउंड' असा मेसेज येतो. त्याचप्रमाणे, पुढील तीन दिवसांसाठी बंगळूरुलाही थेट विमान उपलब्ध नाही. हिंडन विमानतळावरील या वारंवार होणाऱ्या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये असंतोष वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT