Himpriya Dainik Gomantak
देश

धाडसी हिमप्रिया ! दहशतवाद्यांच्या तावडीतून संपूर्ण कुटुंबाची केली होती सुटका

2018 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तिची आई आणि दोन लहान बहिणींसोबत PMRBP पुरस्कार जिंकणाऱ्यांमध्ये 12 वर्षीय गुरुगु हिमप्रिया (Himpriya) देखील होती.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) पुरस्कार विजेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे 2022 आणि 2021 या वर्षांसाठी PMRBP पुरस्कार विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे प्रदान केली जातील. 2018 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तिची आई आणि दोन लहान बहिणींसोबत PMRBP पुरस्कार जिंकणाऱ्यांमध्ये 12 वर्षीय गुरुगु हिमप्रिया (Guru Himpriya) देखील होती. हिमप्रिया त्यावेळी 8 वर्षांची होती. या शौर्याबद्दल तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही घटना घडली तेव्हा सर्वांनाच 8 वर्षाच्या हिमप्रियाचा अभिमान वाटला होता. (Himpriya Had Rescued The Entire Family From The Clutches Of The Terrorists)

दरम्यान, हिमप्रिया तिचे वडील हवालदार गुरुगु सत्यनारायण, आई पद्मावती आणि बहिणी ऋषिता आणि अवंतिका यांच्यासोबत जम्मू-काश्मीरमधील सुंजवानमधील लष्कराच्या निवासी क्वार्टरमध्ये राहत होती. दरम्यान, 10 फेब्रुवारी 2018 रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी कॅम्पवर हल्ला केला होता. छावणीवर हल्ला झाला तेव्हा सत्यनारायण उधमपूरमध्ये ड्यूटीवर होते.

हिमप्रियाने लष्कराला सतर्क केले होते

एका दहशतवाद्याला क्वार्टरमध्ये प्रवेश करताना पाहून पद्मावतीने स्वत:ला आणि तिच्या तीन मुलींना बेडरुममध्ये कोंडून घेतले. जे काही दिसले, ते दारासमोर ठेवले. यादरम्यान पद्मावती आणि 8 वर्षीय हिमप्रियाने तीन तासांहून अधिक काळ दहशतवाद्याला रुममध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. मात्र, दहशतवाद्याने हँडग्रेनेड फेकून रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यात पद्मावती गंभीर जखमी झाली होती.

तसेच, हिमप्रियाने आपल्या आई आणि बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी संघर्ष सुरु ठेवला. तिने दरवाजा उघडला आणि सुमारे तासभर दहशतवाद्यांशी बोलणी सुरु ठेवली. दृढनिश्चयी मुलीने अखेर दहशतवाद्याला तिच्या जखमी आणि बेशुद्ध आईला रुग्णालयात नेण्यासाठी राजी केले. तेथून तिने लष्कराला सतर्क केले. तरुणीच्या माहितीवरुन लष्कराने कारवाई करत दहशतवाद्यांचा खात्मा केला.

PMRBP पुरस्कार विजेते देखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होतात

केंद्र सरकार मुलांना त्यांच्या नावीन्यपूर्ण, समाजसेवा, शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि शौर्य अशा सहा श्रेणींमध्ये त्यांच्या अपवादात्मक कामगिरीबद्दल PMRBP पुरस्कार देते. बाल शक्ती पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये या वर्षी देशभरातील 29 मुलांची PMRBP-2022 साठी निवड करण्यात आली आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) परेडमध्येही पुरस्कार विजेते सहभागी होतात. पीएमआरबीपीच्या प्रत्येक पुरस्कार विजेत्याला एक पदक, एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाते. रोख बक्षिसे PMRBP 2022 च्या विजेत्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Beef Seized: बेळगावातून गोव्यात बेकायदेशीर मांसाची तस्करी, 1930 किलो गोमांस जप्त; दोघे अटकेत

Viral Video: आधी पठ्ठ्यानं रॅपिडो रायडरला फोन करुन बोलावलं अन् नंतर असं काम करुन घेतलं... सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Bihar Crime: चेटकीण असल्याचा संशय, 250 लोकांनी घेरुन एकाच घरातील 5 जणांना ठार केले, पेट्रोल टाकून मृतदेह जाळले

Fashion Factory Exchange Festival: जुने कपडे द्या अन् ब्रँडेड कपडे घ्या...! मुकेश अंबानींचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट; कसं ते जाणून घ्या

Heavy School Bag: मुलांच्या पाठीवर 'दप्तराचे' आणि डोक्यावर 'अभ्यासाचे' ओझे का वाढते आहे?

SCROLL FOR NEXT