Himachal Pradesh Landslide Dainik Gomantak
देश

Himachal Pradesh Landslide: पत्त्याच्या बंगल्यासारखा ढासळला डोंगर; पहा Video

हिमाचलमध्ये दरड कोसळल्याच्या (Himachal Pradesh Landslide) या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असुन अनेक जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा मोठी दरड कोसळल्याची (Himachal Pradesh Land Slide) घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशच्या किनौर जिल्ह्यातील ही घटना असुन या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये डोंगराचा एक मोठा भाग ढासळून खाली येत असल्याचे धडकी भरवणारे दृश्य पहायला मिळते आहे.

ही घटना सांगला-चित्रकुल रोडवरील बटसेरीजवळ घडली. पिंपरी चिटकुळा ते सांगलाकडे जाणाऱ्या एका टेम्पोवर दगड कोसळले. या वाहनात गाडीत चालकासह 11 जण होते. या घटनेत रस्त्यावर असलेला अजुन एक व्यक्तीही जखमी झाला आहे.

या घटनेच्या व्हिडीओमध्ये सांगली खोऱ्यात दगड कोसळल्याचे आणि बाथसेरी पूल उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर घरं आणि झाडांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेत 9 लोकांचा मृत्यू देखील झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर किन्नौर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT