Earthquake in Indonesia |  Dainik Gomantak
देश

Earthquake: हिमाचल प्रदेशात भूकंपाचे हादरे, 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

दैनिक गोमन्तक

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी सकाळी 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाच्या झटक्याची नोंद झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील धर्मशालापासून 22 किमी पूर्वेला पहाटे 5 च्या सुमारास 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.

याबाबत सध्या अधिक माहिती समोर आलेली नाही. याआधी 5 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. जम्मू आणि काश्मीरमध्येही भूकंपाचे झटके बसले होते. तेथे 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदू कुश परिसरात होते

  • नव्या वर्षात भूकंपाचे धक्के

2023 नववर्षाच्या (New Year) पहिल्या दिवशीही देशात वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. 1 जानेवारी रोजी रात्री 11:28 वाजता मेघालयमधील नोंगपोह येथे 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला.

या भूकंपाचा केंद्रबिंदू नॉन्गपोहमध्ये जमिनीपासून 10 किमी अंतरावर होता. त्यापूर्वी 27 आणि 28 डिसेंबरच्या रात्री अडीच तासांच्या आत उत्तराखंडमधील उत्तरकाशीपासून नेपाळपर्यंत अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. नेपाळमधील बागलुंग जिल्ह्यात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला होता. त्यानंतर भूकंपाचा दुसरा धक्का खुंगाच्या आसपास परिसरात जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.3 स्केलवर नोंदवली गेली होती.

  • देशाची पाच भूकंप झोनमध्ये विभागणी

भारतीय मानक ब्युरोने संपूर्ण देशाची पाच भूकंप झोनमध्ये विभागणी केली आहे. देशाचा 59 टक्के भाग भूकंपाच्या धोक्याचे क्षेत्र आहे. पाचवा झोन हा देशातील सर्वात धोकादायक आणि सक्रिय क्षेत्र मानले जातो.

या झोनमध्ये येणारी राज्ये आणि भागात भूकंपामुळे विध्वंसाची शक्यता सर्वाधिक आहे. या पाचव्या झोनमध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेशचा पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरातमधील कच्छ, उत्तर बिहारचा भाग, भारतातील सर्व ईशान्य राज्ये, अंदमान आणि निकोबार बेटे यांचा समावेश होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT