Price Hike Liquir Dainik Gomantak
देश

Price Hike In Alcohol: देशभरातील मद्यांच्या किमतीत आजपासून वाढ, सरकारला मिळणार 45 हजार कोटी रुपये

Price Hike Liquor: नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Ashutosh Masgaunde

आजपासून देशात सर्व प्रकारच्या मद्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याने मद्यप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. वास्तविक आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यासोबतच नवे उत्पादन शुल्क धोरणही लागू झाले आहे. त्यामुळे देशी, इंग्रजी बिअर या तिन्ही प्रकारच्या मद्यांच्या दरात वाढ झाली आहे.

उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांतील सरकारने मद्याचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यांनी याबाबतच्या सूचना मद्य ठेकेदारांनाही सूचना पाठवल्या आहेत.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नवीन उत्पादन शुल्क धोरण 2023-24, 29 जानेवारी रोजी मंजूर करण्यात आले. मोदी मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे.

नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार देशातील मद्य परवाना शुल्क 10 टक्क्यांनी वाढले आहे. अबकारी दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून देशात सर्व प्रकारच्या मद्यांच्या किमतीत वाढ झाली आहे.

नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापूर्वी जून २०२२ मध्ये दारूचे दर वाढले होते. आता दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा दर वाढले असून त्याची अंमलबजावणी आज १ एप्रिलपासून करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Bangalore Special Train: नाताळ आणि नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वेगाड्या, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Shilpa Shetty Goa Hotel: शिल्पा शेट्टीच्या 'बास्टिन रिव्हेरा' हॉटेलवर पडणार हातोडा? खारफुटीच्या जमिनीत बांधकामास परवानी कशी? कोसंबेंचा सवाल

Uterine Cancer: राज्यात 'एचपीव्‍ही'मुळे दरमहा आठ महिलांना गर्भाशय कॅन्‍सर, 5 वर्षांत 527 रुग्‍ण

Goa Politics: काँग्रेसजनांनी 'आप'मध्ये यावे, अरविंद केजरीवालांची काँग्रेस कार्यकर्त्यांना हाक

Goa Road Accident: दोन अपघातांमध्ये तिघे ठार, कुठ्ठाळीत दोघे दुचाकीस्वार तर रामनगर येथे कारचालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT