Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi Dainik Gomantak
देश

Hijab Row: इंशा अल्लाह 'एक दिन हिजाबी प्रधानमंत्री बनेगी', ओवेसींचं ट्वीट होतयं व्हायरलं

दैनिक गोमन्तक

कर्नाटकातील (Karnataka) हिजाब प्रकरणावरुन देशातील राजकारण वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. यातच आज सकाळी AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी एक व्हिडिओ ट्विट करुन पुन्हा वाद निर्माण केला आहे. त्यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओत म्हटलयं की, 'इंशा अल्लाह एक दिवस हिजाबी पंतप्रधान बनेल.' (Hijab Row One Day Hijabi Will Become Prime Minister Owaisis Tweet Is Going Viral)

काय म्हणाले ओवेसी

ओवेसी म्हणाले, 'मुस्लिम (Muslim) धर्मातील मुलगी तिच्या पालकांना म्हणेल, मला हिजाब घालायचा आहे. आणि तिचे पालकही कोणत्याही प्रकारची भीड न बाळगता म्हणतील, हो घाल, तुला हिजाब परिधान करण्यापासून कोण रोखतयं ते मी पाहतोच. हिजाब घालून मुलगीही डॉक्टर बनेल, कलेक्टर आणि बिझनेसवुमनही बनेल, एसडीएमही बनेल, इंशाअल्लाह एक दिवस हिजाबीही पंतप्रधान बनेल. मी हयात नसेन पण ती नक्कीच पंतप्रधान बनले.'

भारतीय राज्यघटनेने हिजाब घालण्याचा अधिकार दिला

याआधी हिजाबच्या मुद्द्यावर वक्तव्य करताना ओवेसी म्हणाले होते की, चादर किंवा हिजाब घालण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने (Indian Constitution) दिला आहे. पुट्टास्वामी यांचा निकाल तुम्हाला तसे करण्यास परवानगी देतो. हीच आमची ओळख असून त्या मुलांना उत्तर देणाऱ्या मुलीला मी सलाम करतो. मी या मुलींना सांगतो की, घाबरण्याची काही एक गरज नाही. कोणतीही मुस्लिम महिला कोणत्याही भीतीशिवाय हिजाब घालू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa SSC Board Result: गोवा बोर्डाचा दहावीचा बुधवारी निकाल

Goa Today's Live News: मुख्यमंत्री सावंत यांनी सपत्नीक घेतले लईराई देवीचे दर्शन

Vasco News : सडा येथील ‘रोज सर्कल’ मैदान रात्रीच्यावेळी मद्यपींचा अड्डा; कारवाई करण्याची मागणी

Israel Hamas War: ‘’गाझावर अणुहल्ला होऊ द्या, इस्रायल युद्ध हरु शकत नाही’’, अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने गोंधळ

Mapusa Rain Update : म्हापशात मान्सूनपूर्व कामांना गती; गटारांची साफसफाई जोरात

SCROLL FOR NEXT