Team India  Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Team India T20 Record: आशिया कप 2025 स्पर्धेसाठी सर्व आठही संघांची जोरात तयारी सुरु आहे. यावर्षीचा आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

Team India T20 Record: आशिया कप 2025 स्पर्धेसाठी सर्व आठही संघांची जोरात तयारी सुरु आहे. यावर्षीचा आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत झालेल्या आशिया कपमध्ये केवळ एकदाच कोणत्याही संघाने 200 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. हा एक अनोखा विक्रम असून यावर्षी हा विक्रम मोडला जातो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

2022 च्या आशिया कपमध्ये भारताने रचला होता विक्रम

आशिया कपच्या टी-20 इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच कोणत्याही संघाने 200 धावांचा टप्पा पार केला आहे. हा विक्रम 2022 मध्ये टीम इंडियाने दुबईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध केला होता. त्या सामन्यात भारताने केवळ दोन गडी गमावून 212 धावांचा डोंगर उभा केला होता. या भव्य धावसंख्येमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या शानदार शतकाचा समावेश होता. त्यानंतर आजपर्यंत टी-20 आशिया कपमध्ये असा मोठा स्कोर झाला नाही.

आजच्या जगात टी-20 क्रिकेट लीग आणि आंतरराष्ट्रीय सामने मोठ्या प्रमाणावर खेळले जात असताना आशिया कपमध्ये केवळ एकदाच 200 हून अधिक धावा झाल्या आहेत, ही बाब आश्चर्यकारक आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाजांनी आक्रमक शैली आत्मसात केल्यामुळे मोठी धावसंख्या बनवणे सोपे झाले असताना आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धेत हा विक्रम अजूनही दुर्मीळ आहे.

पाकिस्तान याबाबतीत दुसऱ्या स्थानावर

दरम्यान, या यादीत दुसरा सर्वात मोठा स्कोर 193 धावांचा आहे, जो पाकिस्तानने बनवला होता. पाकिस्ताननेही 2022 च्या आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध दोन विकेट गमावून हा स्कोर केला होता. हा सामना शारजाह येथे खेळला गेला होता. ही विशेष बाब आहे की, आतापर्यंत दोन वेळा टी-20 फॉरमॅटवर आशिया कप आयोजित केला गेला असला तरी, या स्पर्धेतील टॉप 7 सर्वाधिक स्कोअर 2022 मध्येच झाले होते. 2016 मध्ये पहिल्यांदा जेव्हा टी-20 फॉरमॅटमध्ये आशिया कप झाला होता, तेव्हाचा सर्वात मोठा स्कोर ओमानच्या नावावर होता. ओमानने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 180 धावा केल्या होत्या. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते की, गेल्या काही वर्षांत टी-20 क्रिकेटमध्ये धावा बनवण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे.

मोठ्या अपेक्षा

यावर्षीचा आशिया कप दुबई आणि अबू धाबीमध्ये खेळवला जाणार आहे. क्रिकेट विश्वाला अशी अपेक्षा आहे की, यावर्षी काही नवीन विक्रम पाहायला मिळतील. 2022 पासून आतापर्यंत क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलली आहे आणि अनेक नवीन आक्रमक फलंदाज समोर आले आहेत. त्यामुळे या वर्षीचा टी-20 आशिया कप कोणत्या प्रकारे वेगळा ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. यावर्षी मोठी धावसंख्या बनवून एखादा संघ 200 धावांचा टप्पा पार करेल का, हे लवकरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT