BJP Leader Shahnawaz Hussain Dainik Gomantak
देश

BJP नेते शहनाबाज हुसैन यांना मोठा झटका, 'बलात्काराचा गुन्हा तात्काळ दाखल करा'

BJP Leader Shahnawaz Hussain: 2018 मध्ये महिलेने माजी केंद्रीय मंत्री हुसैन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

दैनिक गोमन्तक

BJP Leader Shahnawaz Hussain: भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शहनाबाज हुसैन यांना उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी हुसैन यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच तीन महिन्यांत तपास पूर्ण करुन आरोपपत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 2018 मध्ये महिलेने माजी केंद्रीय मंत्री हुसैन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

दरम्यान, उच्च न्यायालय (High Court) माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसैन यांच्या अडचणी वाढवू शकते. न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार देताना दिल्ली पोलिसांना (Delhi Police) महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे, न्यायमूर्ती आशा मेनन यांनी दिल्ली पोलिसांना तीन महिन्यांत या प्रकरणाची चौकशी करुन फौजदारी कलम 173 अंतर्गत संबंधित न्यायालयात अहवाल (Charge Sheet) दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायमूर्ती मेनन यांनी निरीक्षण नोंदवले की "याचिकाकर्ते हुसैन यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यास पोलिस पूर्णपणे नाखूष दिसत आहेत." याप्रकरणी पोलिसांच्या कामकाजावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT