Arrested Dainik Gomantak
देश

चार किलो हेरॉईन, 3 लाख रुपये किमतीचे ड्रग मनी आणि 12 जणांना अटक… अमृतसर पोलिसांकडून मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

Amritsar Police: हेरॉईन तस्करीच्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमृतसर पोलिसांनी 4 किलो हेरॉईन आणि 3 लाख रुपये किमतीचे ड्रग मनी जप्त केले आहे.

Manish Jadhav

Amritsar Police: हेरॉईन तस्करीच्या प्रकरणात अमृतसर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमृतसर पोलिसांनी 4 किलो हेरॉईन आणि 3 लाख रुपये किमतीचे ड्रग मनी जप्त केले आहे. यासोबतच 12 जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत 28 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे सीमेपलीकडून सुरु असलेल्या तस्करीला मोठा फटका बसला आहे. हे रॅकेट पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात ड्रग्स पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करत असे. हे ड्रग्ज सीमेपलीकडून पाकिस्तानातून यायचे.

तपासादरम्यान हे संपूर्ण नेटवर्क मलेशियातून चालवले जात असल्याचे समोर आले. हे सर्व फक्त मॉड्यूल आहेत. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत दोन आरोपींची ओळख पटली आहे. दोन्ही आरोपी तरनतारनमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

मलेशियामध्ये बसलेला ‘मास्टरमाइंड’

दरम्यान, हे रॅकेट मलेशियामध्ये बसलेले टॉप स्मगलर्स चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 2019 मध्ये एकदा अटारी सीमेवरील आंतरराष्ट्रीय चेक पोस्टवर 532 किलो हेरॉईनची मोठी खेप पकडण्यात आली होती. पाकिस्तानी हँडलर आणि किंगपिन सराय अमानत खानच्या सांगण्यावरुन रणजित सिंह उर्फ ​​चित्ता याने त्याचे नेतृत्व केले होते.

नेटवर्कचा पर्दाफाश

दुसरीकडे, पुढील कारवाई सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची ओळख पटली आहे. आकाशदीप सिंग उर्फ ​​आकाश आणि कुलदीप सिंग उर्फ ​​गोरा. पोलीस तपासात हे आरोपी तरनतारनचे रहिवासी असल्याचे समोर आले. मात्र ते दुसऱ्या जिल्ह्यात रुम करुन राहत होते. तेथून ते हे संपूर्ण नेटवर्क चालवत होते. पाकिस्तानातून येणारा माल ते त्याच ठिकाणी ठेवायचे. अंमली पदार्थ जप्ती आणि अटकेसाठी पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT