heroin worth crore seized airport three accused arrested west bengal Dainik Gomantak
देश

विमानतळावर 113 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त, 2 महिलांना अटक

विमानतळावर 16.15 किलो हेरॉईन जप्त

दैनिक गोमन्तक

कोलकाता विमानतळावर मोठ्या प्रमाणावर हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दोन महिलांसह तीन आफ्रिकन प्रवाशांकडून सुमारे 113 कोटी रुपयांचे 16.15 किलो हेरॉईन जप्त केले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई (action) करत डीआरआयने तीन आरोपींना पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, एक आरोपी केनियाचा आहे. तर दोन महिला मलावी येथील आहेत.

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे 4 बॅग होत्या. विमानतळावर (Airport) त्यांची तपासणी केली असता तपकिरी पावडरने भरलेली 14 पाकिटे आढळून आली. डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींकडून हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. यातील दोन आरोपी मेडिकल (Medical) व्हिसावर आले होते, तर एक बिझनेस व्हिसावर भारतात आला होता, असे त्यांनी सांगितले.

एजन्सीनुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आधी आफ्रिकेतून दुबईला गेला. तेथून त्यांनी कोलकात्याला विमान पकडले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT